इजिप्तमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या कारवाईत ४० आतंकवादी ठार

आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर इजिप्तचे पोलीस तात्काळ कारवाई करून संशयित आतंकवाद्यांना थेट गोळ्या घालून ठार करतात, तर भारतात आतंकवाद्यांकडून सातत्याने आतंकवादी कारवाया होत असतांना, तसेच सीमेवर आतंकवादी आक्रमणांत सैनिक हुतात्मा होत असतांनाही सरकार निष्क्रीय रहाते ! इजिप्तच्या कृतीतून बोध घेऊन केंद्रातील भाजप सरकार जागे होणार का ?

कैरो (इजिप्त) – येथील गिझा पिरॅमिडजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर इजिप्तच्या पोलिसांनी २९ डिसेंबरला विविध ठिकाणी टाकलेल्या छाडींमध्ये ४० संशयित आतंकवाद्यांना ठार केले. यातील २ छापे गिझा भागात टाकण्यात आले. या ठिकाणी ३० आतंकवादी मारले गेले, तर उत्तर सिनाई भागात १० आतंकवादी मारले गेले. हे आतंकवादी विविध पर्यटनाच्या ठिकाणी, सरकारी संस्था, आर्थिक संस्था, संरक्षणदल आणि चर्च यांवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाडी टाकल्या. या आतंकवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडले.

कैरो शहराबाहेरील गिझा पिरॅमिडजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामुळे प्रवासी बसमधील ४ प्रवासी ठार, तर ११ प्रवासी घायाळ झाले होते. मृतांमध्ये व्हिएतनामचे ३ आणि इजिप्तचा १ पर्यटक गाइड होता.


Multi Language |Offline reading | PDF