भारतियांना ४३२ कोटी रुपयांची लाच देण्यात आली ! – सीबीआयचा दावा

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा

बोफोर्स प्रकरणातही असेच दावे करण्यात आले होते; मात्र संबंधितांना अद्यापही अटक झालेली नाही, ही वस्तूस्थिती पहाता यातही असे घडल्यास आश्‍चर्य वाटू नये !

नवी देहली – ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल आणि गुइडो हाश्के यांनी भारतियांना ४३२ कोटी रुपयांची लाच दिली, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

१. या वृत्तानुसार मिशेल आणि हाश्के यांनी ८ मे २०११ या दिवशी दुबईत केलेल्या करारात ५८ मिलियन युरो रकमेचा उल्लेख होता. दुबईतील ही बैठक दोघांकडून ‘दलालांमध्ये किती रकमेचे वाटप करायचे’, यासाठी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मिशेल, त्याचे सहकारी हाश्के, कार्लो गेरोसा आणि त्यागी बंधू सहभागी होते.

२. दोन मध्यस्थांमध्ये रक्कम वाटपाविषयीचा माहिती यामध्ये आहे. २२ मिलियन युरो ‘कुटुंबा’साठी आणि ३२ मिलियन युरो ‘टीम’साठी वाटण्यात आले असल्याची माहिती पुढे आली.

३. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार वायूदलाचे माजी प्रमुख एस्.पी. त्यागी आणि त्यांचे नातेवाईक असलेले संदीप, संजीव आणि राजीव त्यागी यांना १०.५ मिलियन युरो देण्यात येणार होते. त्यांतील ३ मिलियन युरो त्यांना देण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF