घुसखोरी करणारे २ पाक सैनिक ठार

‘१-२ सैनिकांना नव्हे, तर पाकच्या संपूर्ण सैन्याला नष्ट केल्याविना भारताला शांतता मिळणार नाही’, हे भारतीय शासनकर्ते जाणतील आणि त्या अनुषंगाने ते कृती करतील, तो भारतियांसाठी सुदिन म्हणावा लागेल !

श्रीनगर – नौगाम सेक्टर येथील नियंत्रणरेषेवर भारतीय सैन्याने घुसखोरी करू पहाणार्‍या २ पाकिस्तानी सैनिकांंना ठार केले. हे दोघेही पाकच्या ‘बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’चे (‘बॅट’चे) सदस्य होते. ते भारतीय सैन्याच्या विरोधात मोठी कारवाई करण्याच्या प्रयत्नात होते. या दोघांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळ्यांचा साठा मिळाला. यांवर पाकचे चिन्ह आहे. ठार झालेल्या पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या वेळी घालण्यात येणारा गणवेश परिधान केला होता. तसेच त्यांच्यासमवेत असणार्‍या अन्य घुसखोरांनी भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या आणि भारतीय सैन्याच्या जुन्या गणवेशासारखे कपडेही परिधान केले होते. ठार झालेल्या २ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह परत घेऊन जाण्यास पाकला सांगण्यात येणार असल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे. पाकमधील ‘बॅट’च्या सैनिकांनी यापूर्वी काही भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करून त्यांची क्रूरपणे हत्या केली होती.


Multi Language |Offline reading | PDF