वर्ष २०१७-१८ मध्ये घोटाळेबाजांनी बँकांचे ४१ सहस्र १६७ कोटी रुपये लुटले !

  • चोर आणि दरोडेखोर यांच्यापेक्षा पांढरपेशा गुन्हेगारांमुळे होणारी लूट भाजप सरकारला दिसत नाही का ? यावर प्रतिबंध घालण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, हे सांगणार का ?
  • अशा गुन्हेगारांनाही फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकार कायदा का करत नाही ?

नवी देहली – वर्ष २०१७-१८ मध्ये विविध घोटाळ्यांमधून बँकांचे ४१ सहस्र १६७ कोटी रुपये लुटण्यात आले, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता हा आकडा ७२ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी हा आकडा २३ सहस्र ९३३ कोटी रुपये एवढा होता. वर्ष २०१७-१८ मध्ये बँकांची फसवणूक केल्याची ५ सहस्र ७६ प्रकरणे समोर आली, तर गेल्या वर्षी हा आकडा ५ सहस्र ९१७ इतका होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now