शीखविरोधी दंगलीतील दोषी काँग्रेस नेते सज्जनकुमार अखेर शरण

नवी देहली – वर्ष १९८४ मध्ये देहली येथे झालेल्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे नेते सज्जनकुमार, तसेच महेंदर यादव आणि किशन खोखर हे देहलीच्या कडकडडुमा न्यायालयात शरण आले. सज्जनकुमार यांना या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. देहली न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्यास सांगितले होते. यावर सज्जनकुमार यांनी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळल्याने अखेर ते शरण आले.


Multi Language |Offline reading | PDF