भीम आर्मीचे आझाद यांना पुणे येथे कार्यक्रम घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली !

सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची दर्पोक्ती केलेल्या रावण यांना उच्च न्यायालयाची सणसणीत चपराक !

मुंबई – भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उपाख्य उर्फ रावण यांच्या पुणे येथील सभेला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली आहे. पुणे प्रशासनाने ३० डिसेंबर या दिवशी होणार्‍या पुण्यातील एस्एस्पीएम्एस् मैदानावरील राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेला अनुमती नाकारली होती. या महासभेमध्ये चंद्रशेखर आझाद हे संबोधित करणार होते. या प्रकरणी भीम आर्मीने न्यायालयाकडे दाद मागितली; परंतु ३१ डिसेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सभेला अनुमती देण्यास नकार दिला.

चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की, प्रशासनाने कितीही जोर लावला तरीही आम्ही भीमा कोरेगावला जाणारच. कोरेगाव भीमा येथे जाण्यास त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF