बांगलादेशातील निवडणुकीमध्ये सत्ताधारी शेख हसीना यांच्या पक्षाचा मोठा विजय

ढाका – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगने सार्वजनिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे त्या चौथ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. दुसरीकडे या निवडणुकीच्या काळात राजकीय हिंसेमध्ये देशभरात १७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर विरोधी पक्षांनी मतदानात गडबड केल्याचा आरोप करत पुन्हा एकदा मतदानाची मागणी केली आहे. आवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३०० पैकी २६६ जागांवर विजय नोंदवला आहे. शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले असल्याचे बोलले जात आहे. आवामी लीग पक्षाचे भारताशी नेहमीच सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. (‘सौहार्दाचे संबंध असले, तरी बांगलादेशातील हिंदूंची स्थिती अद्यापही दयनीय का आहे ? शेख हसीना तेथील हिंदूंचे रक्षण का करत नाहीत ?’, हे भाजप सरकारने सांगायला हवे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now