विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा २ जानेवारीपर्यंत स्थगित

  • गोंधळ घालणार्‍या खासदारांकडून सभागृहाच्या कामकाजावर करण्यात येणार खर्च वसूल करण्याचा नियम भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत का बनवला नाही ?
  • गोंधळ घालणार्‍या खासदारांना कठोर शिक्षा करण्याचा नियम गेल्या ७० वर्षांत का बनवण्यात आला नाही, यावरून सर्वपक्षियांना जनतेने जाब विचारला पाहिजे ! 

नवी देहली – तोंडी तलाकचे लोकसभेत संमत झालेले विधेयक राज्यसभेत ३१ डिसेंबरला मांडण्यात येणार होते; मात्र काँग्रेससह विरोधी पक्षांनी घातलेलेल्या गदारोळामुळे सभागृह २ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याने हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले नाही. लोकसभेतही या विधेयकाला संमती मिळाली होती, तेव्हा काँग्रेससह अनेक विरोधकांनी सभात्याग केला होता.


Multi Language |Offline reading | PDF