बौद्ध कायदा संसदेत मांडण्यासाठी आपल्या विचारांचे खासदार लोकसभेत पाठवा ! – भीमराव आंबेडकर

  • प्रत्येक पंथाने वेगळा कायदा करण्याचे ठरवले, तर भारत पुन्हा छोट्या-छोट्या संस्थानांमध्ये विखुरला जाण्यास वेळ लागणार नाही !
  • अन्य पंथीय त्यांच्या पंथाला मानणार्‍यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात, तर बहुसंख्य हिंदू हिंदूंसाठी काहीही न करणार्‍यांना निवडून देतात.

सातारा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – बौद्ध कायदा होण्यासाठी अनेक वर्षे आपण मागणी करत आहोत; परंतु आपले विधेयक संसदेत मांडण्यासाठी खासदार नाहीत. बौद्ध कायदा होण्यासाठी येणार्‍या काळात आपल्या विचारांचे खासदार लोकसभेत पाठवा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले. कराड (सातारा) येथे आयोजित परिषदेमध्ये ते बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF