हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांचा दुतोंडीपणा !


आज ३१ डिसेंबर ! बड्या बड्या ‘रेव्ह पार्ट्यां’चे पोस्टर झळकू लागली आहेत. देशात दारू विक्रीचा बाजार सर्वांत झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रात भारत जगात सध्या तिसर्‍या क्रमांकावर आहे. ‘विस्की’ नावाचा दारूचा प्रकार भारतात सर्वाधिक विक्री होतो. अशा ‘पार्ट्यां’मध्ये काय चालते, तर दारू, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय आणि नाचगाणी ! याविषयी बोलणे म्हणजे जुनाट विचार प्रकट केल्याचा स्वत:वर आरोप करून घेण्यासमान आहे. यामुळे जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण यांसमवेतच वाहतुकीचे कायदे मोडले जातात, तरीही याला कोणाचा ठोस विरोध होतांना दिसत नाही. अगदी बेकायदेशीर घटना सर्रास होतांना दिसतात. तरीही पोलीस आणि समान्य प्रशासन विभाग डोळे बंद करून घेतात.

मेणबत्तीवाले कुठे जातात ?

हिंदूंच्या प्रत्येक सणाला मेणबत्तीवाले जागृत होतात आणि त्या विरोधात निषेध करत असतात; परंतु ३१ डिसेंबरचे वारे वाहू लागले की, यांच्या मेणबत्त्या विझतात. समाजसुधारक आणि साम्यवादी हे या सर्व प्रकाराच्या विरोधात किती मोर्चे काढतात, हे सर्वांनीच अभ्यासावे आणि काय तो संदेश समजून घ्यावा. हिंदु सणापुरते कथित प्रदूषणाचा निषेध करणारी हीच मंडळी ३१ डिसेंबरला रात्रभर दंगा करतात, हे विशेष !

प्रत्येक रंगपंचमीला पाण्याची ‘बोंब’ आणि होळीला पोळीविषयी ‘आगडोंब’ करणारे विचार(?)वंत ३१ डिसेंबरच्या रात्री कोठे जातात ? या रात्री होणारे मृत्यू, बलात्कार, चोर्‍या, मारामार्‍या यांना उत्तरदायी कोण, याचे उत्तर साम्यवाद्यांनी द्यावे. गणेश मंडळांवर सर्रास कारवाई करणार्‍या प्रशासकीय आणि न्याय या यंत्रणा या वेळी का गप्प बसतात ? फटाके आणि ध्वनीप्रदूषण यांच्या कठोर कायद्यांच्या  आदेशांची पायमल्ली या दिवशी सर्वांच्या संमतीने होणार असेल, तर ‘कायद्याचा बडगा उगारतांना वर्गवारी केली आहे का’, असा प्रश्‍न सर्वसामान्यांच्या मनात येणे साहजिक आहे. याचे उत्तर हिंदूंंनी कोणाकडे मागावे ?

थोडक्यात काय, तर हिंदूंच्या प्रश्‍नांचे केवळ उत्तरच नव्हे, तर एकूण या अपप्रकारांना आळा केवळ हिंदु राष्ट्रातच बसेल, हे लक्षात घ्यायला हवे.

– अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF