कल्याण येथील कार्यक्रमात हिंदु दांपत्याचे जाहीरपणे बौद्ध धर्मात धर्मांतर !

  • हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र सर्वत्र मोठ्या प्रमाणात चालू असल्याचेच हे प्रमाण आहे !
  • हिंदूंनो, धर्मांतरे रोखण्यासाठी ‘धर्मांतरबंदी कायदा हवाच’ याची जोरदार मागणी सरकारकडे करण्यासाठी संघटित होऊन आवाज उठवा !

कल्याण – येथील वालधुनी परिसरातील अशोकनगरात ‘बुद्धभूमी फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात पुण्यातील एका हिंदु दांपत्याला धर्मांतरित करून त्याला बौद्ध पंथाची दीक्षा २८ डिसेंबरला देण्यात आली आहे.

ब्रह्मदेशातून आणलेल्या १२ फूट उंच आणि १३ टन वजनाच्या बुद्धमूर्तीच्या स्थापनेचा हा कार्यक्रम होता. या मूर्तीसाठी बुद्धभूमी फाऊंडेशनने १ कोटी रुपयांचा निधी समाजातून वर्गणीच्या स्वरूपात गोळा केला होता. या वेळी कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती प्रयोग सादर करण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now