श्रीनगरमध्ये जामिया मशिदीवर इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावले

गेल्या अनेक महिन्यांपासून या मशिदीबाहेर इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावण्यात येत असतांना सरकार त्यांच्यावर आतंकवाद्यांवर कारवाई करतात तशी कारवाई करण्याचा अधिकार सैन्याला का देत नाही ? अशा देशद्रोह्यांवर कठोर कारवाई केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

श्रीनगर – येथील जामिया मशिदीवर पुन्हा एकदा शुक्रवार, २८ डिसेंबरला रात्री काही देशद्रोही धर्मांधांकडून इस्लामिक स्टेटचे झेंड फडकावण्यात आले. याची चित्रफीत सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे. या वेळी देशविरोधी घोषणाही देण्यात आल्या. याच मशिदीबाहेर २ वर्षापूर्वी जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी महमंद अयूब पंडित याची हत्या करण्यात आली होती.

मेहबूबा मुफ्तींकडून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांवरील कारवाईचा विरोध

मेहबूबा मुफ्ती यांनी आतापर्यंत किती वेळा जिहादी आतंकवाद्यांवरील कारवाईचे समर्थन केले आहे, हे त्यांनी सांगावे !  अशा धर्मांध नेत्यांमुळेच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होत नाही, हे लक्षात घेऊन अशांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी देहली आणि उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या १० आतंकवाद्यांवरील कारवाईचा विरोध केला आहे.  त्या म्हणाल्या की, देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न महत्त्वाचा असला, तरी केवळ सुतळी बॉम्बच्या आधारे कोणाला आतंकवादी आणि इस्लामिक स्टेटचे म्हणणे अयोग्य आहे. अशामुळेच लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे एन्आयने धडा घ्यायला हवे की, अशा प्रकारणामध्ये यापूर्वी अनेक जण निर्दोष मुक्त झाले आहेत. (हा प्रश्‍न मेहबूबा मुफ्ती यांना साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, नालासोपारा प्रकरणात अटक करण्यात आलेले वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर यांच्याविषयी का विचारावासा वाटला नाही ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF