गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पुणे आणि धाराशिव येथून १६ टन गोमांस जप्त

गोवंशहत्या टाळण्यासाठी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक !

पुणे – महाराष्ट्रात सर्वत्र गोवंश हत्याबंदी कायदा असूनही कसायांना त्याचे अजिबात भय वाटत नसल्याचे कटू सत्य समोर आले आहे. परंडा (धाराशिव) येथे गोमांसाने भरलेले आणि बाहेरून देखाव्यापुरती भुशाची पोती लावलेले १० टन गोमांस असलेले २, तळेगाव दाभाडे येथून ६ टन गोमांस असलेला एक आणि चाकण येथून ८०० किलो गोमांस असलेला एक टेम्पो पोलिसांनी कह्यात घेतला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली.  या वेळी बजरंग दल आणि समस्त हिंदू आघाडी गोरक्षण विभागाच्या गोरक्षकांनी कारवाईत सहभाग घेतला. मध्यरात्रीच्या काळोखात सशस्त्र कसायांनी गोरक्षकांचा पाठलाग करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; पण गोरक्षक शिवशंकर स्वामी यांच्या चातुर्यामुळे कसायांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. परांडा आणि संगमनेर येथे मोठ्या प्रमाणावर गोहत्या चालू असल्याचे विदारक सत्य यातून समोर आले आहे.

फलटण येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ८ वासरांना मिळाले जीवदान !

जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नावळी कोळविहिर रोड येथे ८ गाई-वासरांना घेऊन जाणारी गाडी बजरंगदल पुरंदर येथील गोरक्षकांच्या साहाय्याने पकडण्यात आली. गोरक्षकांना पहाताच चालकाने पलायन केले असून गाडीतील सर्व गायींना सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now