कर्नाटकमध्ये श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे लेखक के.एस्. भगवान यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

  • स्वपक्षाचा आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अवमान झाल्यावर ‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटावर आक्षेप घेणारी काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्तेवर असतांना प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे लेखक भगवान यांच्या पुस्तकावर बंदी का घालत नाही ?
  • मंदिरांत जाऊन दर्शन घेणारे राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष प्रभु  श्रीरामाचा अवमान होणार्‍या पुस्तकावर कारवाई करण्याचे धाडस दाखवत का नाही ? कि मंदिरात जाणे ही केवळ हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक आहे ?
के.एस्. भगवान

मैसूरू (कर्नाटक) – लेखक के.एस्. भगवान यांनी त्यांच्या कन्नड भाषेतील ‘राम मंदिर याके बेडा’ (राममंदिर का नको?) या पुस्तकामध्ये हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांचा हिंंदु धर्माभिमान्यांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने त्यांना पोलीस सुरक्षा पुरवली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाल्याने त्याला पुन्हा विरोध केला जात आहे. के.एस्. भगवान यांनी या पुस्तकामध्ये श्रीरामाला ‘दारूडा’ आणि ‘मांसभक्षक’ म्हटले आहे. यामुळे कोडगु येथील अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी भगवान यांच्या विरोधात मडीकेरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात तक्रार करणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांचे अभिनंदन ! असे अधिवक्ते सर्वत्र हवेत ! – संपादक)

लेखक के.एस्. भगवान यांचे कन्नड भाषेतील पुस्तक ‘राम मंदिर याके बेडा’ (राममंदिर का नको?)

१. ‘भगवान यांनी द्वेषभावना पसरवली आहे. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

२. ‘भगवान यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण मैसूरू पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे’, असे कोडगूचे पोलीस अधीक्षक सुमन पन्नेकर यांनी सांगितले.

३. ‘श्रीराम दारू पित होते आणि सीतेलाही दारू पाजत होते. १४ वर्षांच्या वनवासातून परतल्यानंतर राम चैनी जीवन जगत होता’, असा दावा भगवान यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केला आहे. त्यासाठी त्यांनी वाल्मीकि रामायणाच्या उत्तरकांडातील काही श्‍लोकांचा संदर्भ दिला आहे. (असे श्‍लोक आतापर्यंत इतरांना कसे आढळले नाहीत ? ते केवळ भगवान यांनाच कसे आढळले ? अन्य पंथियांच्या धर्मग्रंथांत काय लिहिले आहे, ते लिहिण्याचे धाडस भगवान कधी दाखवतील का ? – संपादक)

पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्यावरून कन्नड वृत्तवाहिनीच्या निवेदकाची क्षमायाचना

मुसलमान आणि त्यांच्या संघटनांच्या विरोधाचा परिणाम !

हिंदू कधी त्यांच्या धर्मश्रद्धांच्या अवमानाच्या विरोधात संघटितपणे असा विरोध करतात का ?

बेंगळुरू – ‘सुवर्ण टीव्ही’च्या वृत्तवाहिनीच्या अजित हनुमक्कनवार या निवेदकाने वाहिनीवर चालू असलेल्या एका कार्यक्रमात इस्लामच्या संस्थापकाविषयी अनुचित शब्दांचा कथित वापर केल्यावरून अनेक मुसलमान आणि मुसलमान संघटना यांनी त्यांच्याविरुद्ध सामाजिक माध्यमांवर टीका केली. हनुमक्कनवार यांना धमकीचे अनेक दूरध्वनी आले. काहींनी ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे अजित हनुमक्कनवार यांनी वृत्तवाहिनीवरून जाहीर क्षमायाचना केली.

लेखक प्रा. भगवान यांच्याविरोधात काँग्रेसचे नेते खासगी दावा प्रविष्ट करणार

खासगी दावा प्रविष्ट करण्यापेक्षा कर्नाटकात सत्तेवर असणारी काँग्रेस स्वतःहून कारवाई का करत नाही ?

पुत्तुरू (कर्नाटक) – हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे प्रा. भगवान, तसेच महंमद पैगंबरांविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणार्‍या ‘सुवर्ण टीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करून न्यायालयात खासगी दावा प्रविष्ट करण्यात येईल, असे पुत्तुरू ब्लॉकचे माजी काँग्रेस अध्यक्ष कावु हेमनाथ शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. भगवान यांच्या विरुद्ध सरकारनेच पोलिसांना सूचना देऊन स्वतःच प्रकरण प्रविष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शेट्टी म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षाचे असलो, तरी वैयक्तिक नावाखाली प्रकरण प्रविष्ट करणार आहोत. कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांची अवहेलना करण्यामागे समाजातील शांततेचा भंग करण्याचा उद्देश लपलेला आहे. स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणार्‍या प्रा. भगवान यांनी अनेक वेळा श्रीरामाविषयी आक्षेपार्ह भाष्य केले आहे. श्रीरामाविषयी त्यांचे भिन्न मत असल्यास ते पुराव्यांसह त्यांच्या लिखाणातून सादर करावे. मोकळेपणाने चर्चा करण्यास आमचा विरोध नाही. श्रीराम कोणत्याही एका पक्षाचा ठेवा नाही. (असे आहे, तर केंद्रात सत्ता असतांना अयोध्येत राममंदिर का बांधले नाही आणि अजूनही काँग्रेसवाले त्याला विरोध का करत आहेत ? – संपादक) केवळ हिंदु धर्मीयच नव्हे, तर इतर धर्मीयही श्रीरामाचा आदर करतात. (हे ठाऊक आहे, तर राममंदिरासाठी पुढाकार का घेत नाही ? – संपादक) या पार्श्‍वभूमीवर आम्ही भगवान यांच्या विरुद्ध पुत्तुरूनगर ठाण्यात प्रकरण प्रविष्ट करत आहोत. गुन्हा नोंदवण्यात आला नाही, तर न्यायालयात खासगी दावा प्रविष्ट करणार आहोत.

पैगंबरांच्या अवमानाविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट

उडुपी – ‘सोशल डेमॉक्रेटीक फ्रंट ऑफ इंडिया’(एस्डीपीआय)च्या वतीने खासगी वृत्तवाहिनीवर चाललेल्या चर्चासत्रात प्रेषित महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांची निंदा केल्याविषयी उडुपी नगर ठाण्यात वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या विरोधात एस्डीपीआयने तक्रार नोंदवली आहे.


Multi Language |Offline reading | PDF