अशा दंगलखोरांची नरजकैदेतून सुटका करावी का, याचा सरकारने विचार करावा !
मुंबई – ‘सरफरोशी की समा आज हमारे दिल मे है’, असे म्हणत मी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणार आहे, असे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले. राज्य सरकारने नजरकैदेतून सुटका केल्यानंतर चंद्रशेखर यांनी सरकारच्या विरोधात दर्पोक्तीयुक्त विधाने केली. ते म्हणाले, ‘‘मला विरोध करणे, म्हणजे संविधानाला विरोध करणे होय. मी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे.’’