मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करणार

  • सर्वधर्मियांच्या नावाखाली हिंदूंव्यतिरिक्त केवळ अन्य पंथियांनाच यातून सुविधा मिळतील, हे वेगळे सांगायला नको !
  • अशा प्रकारचे नाव देऊन ‘आम्ही अध्यात्मासाठी काहीतरी करत आहोत’, असेच दाखवण्याचा हिंदुद्वेषी आणि ढोंगी काँग्रेसचा प्रयत्न आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

भोपाळ – मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यात सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे देण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये असा विभाग बनवण्याचे आश्‍वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. या विभागामध्ये पूर्वीच्या भाजप सरकारने बनवलेल्या ‘आनंद विभागा’सह अन्य काही अशा प्रकारचे विभाग यात सामावून घेण्यात येणार आहेत.

काँग्रेसने निवडणुकीमध्ये संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देणे, राम वन गमन पथ बनवणे, राज्यभरात गोशाळा बनवणे, आदी आश्‍वासने दिली होती. (गोशाळांसह गोहत्या बंदीविषयी काँग्रेस सरकार का बोलत नाही आणि तसे करून का दाखवत नाही ? संस्कृतला मृतभाषा ठरवणारी काँग्रेस हिंदूंच्या मतांसाठी संस्कृतचे शिक्षण देण्याचे आश्‍वासन देत आहे. हे आश्‍वासन ती पूर्ण करील, यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF