इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचा दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजात गोळीबाराचा सराव !

देशात जिहादी आतंकवादी बॉम्ब फोडत असतांना आणि गोळीबार करत असतांना हिंदू दिवाळीत अब्जावधी रुपयांचे फटाके फोडून आतंकवाद्यांना अशा प्रकारे साहाय्यच करत आहेत, हे आतातरी त्यांच्या लक्षात येईल का ? हिंदूंनो, शत्रू युद्धाची सिद्धता करत असतांना तुम्ही आता किती दिवस गाफील रहाणार आहात ?

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने देहली आणि उत्तरप्रदेश येथून अटक केलेल्या इस्लामिक स्टेटच्या १० आतंकवाद्यांनी दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांच्या आवाजाच्या वेळी गोळीबाराचा सराव केला होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. फटाक्यांच्या आवाजात गोळीबाराचा आवाज लक्षात येणार नाही, याच अनुषंगाने त्यांनी हा सराव केला होता.


Multi Language |Offline reading | PDF