श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या सातारा विभागाचा उपक्रम
सातारा, ३० डिसेंबर (वार्ता.) – मागील वर्षी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. यामुळे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने कै. राहुल फटांगडे यांचा प्रथम ‘पुण्यस्मरण दिन’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सातारा तालुकाप्रमुख श्री. शुभम शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
१ जानेवारी २०१९ या दिवशी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरील परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पाचारण करण्यात आले आहे. या वेळी महारक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानने आयोजित केलेल्या जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरील परिसरात होणार्या कार्यक्रमासाठी कै. राहुल फटांगडे यांचे माता-पिता उपस्थित राहणार आहेत.