३१ डिसेंबरला रात्रभर पब, बार, हॉटेल चालू रहाणार !

अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून वाढीव बंदोबस्त !

 • १ जानेवारीला नववर्ष मानण्याला कोणताही खगोलशास्त्रीय आधार नसल्याने तीही अंधश्रद्धाच !

 • एकीकडे मद्य पिऊन वाहने चालवणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना कामाला लावायचे आणि दुसरीकडे मद्य प्यायला प्रोत्साहन देत रहायचे, असाच भाजप सरकारचा कारभार आहे ! हिंदूंनो, संस्कृती रक्षणासाठी आणि पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे होणारे अनुचित प्रकार थांबण्यासाठी आता हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे, हे जाणा !

 • ३१ डिसेंबरला ख्रिस्त्यांचे नववर्ष साजरे करायला अनुकूल वातावरण निर्माण करून देणारे सरकार त्यामुळे घडणारे अपघात, बलात्कार, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांचे दायित्व घेणार का ?

 • ‘ख्रिस्ती नववर्षाचा जल्लोष म्हणजे पोलीस यंत्रणेवर ताण’ असेच समीकरण झाले आहे !

मुंबई – ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री पब, बार आणि हॉटेल, तसेच मॉल आणि बाजारपेठाही चालू ठेवण्यासाठी सरकारने अनुमती दिली आहे.

महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेषात पोलीस वावरणार आहेत. लाईव्ह कॅमेर्‍यानेही पोलीस मुंबईवर लक्ष ठेवतील. मद्यपींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. झोपडपट्टीसह उच्चभ्रू वस्त्यांमध्येही ‘कोम्बिंग ऑपरेशन’ चालू करण्यात आले आहे. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ४० सहस्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. फोर्स वन, एस्आर्पीएफ्, क्यूआर्टी यांच्या पथकांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. (यावरून ख्रिस्ती नववर्ष साजरे करतांना चंगळवाद, व्यसनाधीनता यांसह इतर अनुचित प्रकारांचे प्रमाण किती वाढते, हेच यातून लक्षात येते !  मुंबईकर मद्य पिऊन जल्लोष करत असतांना आणि पोलीस त्यांना सांभाळत असतांना अतिरेकी आक्रमण झाले, तर काय गोंधळ उडेल, याची कल्पनाच न केलेली बरी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF