राज्याच्या लोकसंख्येत घट होत असल्याने आवाहन
- चंद्राबाबू नायडू यांचे हे आवाहन हिंदु धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. हिंदूंमध्ये प्रथम अपत्याला ‘धर्मज’ संबोधले जाते, तर त्यानंतरच्या अपत्यांना ‘कामज’ संबोधले जाते. शासनकर्त्यांना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते अशा प्रकारचे आवाहन करतात !
- भारतात लोकसंख्या अल्प होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या उलट एका राज्याचे मुख्यमंत्री मात्र लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन करतात. अधिक अपत्यांना जन्म दिल्याने त्यांच्या पालनपोषणाचा खर्च चंद्राबाबू नायडू त्यांच्या खिशातून करणार आहेत का ?
- ‘या आवाहनाला हिंदू नव्हे, तर अल्पसंख्य समाज नक्की प्रतिसाद देणार आणि भविष्यात त्याचा फटका हिंदूंना बसणार’, हे चंद्राबाबू नायडू यांच्या लक्षात कसे येत नाही ?
विजयवाडा (आंध्रप्रदेश) – २ किंवा २ पेक्षा अधिक अपत्य होऊ द्या, असे आवाहन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. तसेच २ किंवा त्यापेक्षा अधिक अपत्यांना जन्म देणार्या पालकांना भत्ता देण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच २ पेक्षा अधिक अपत्य असणार्या उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही, हा नियमही त्यांनी रहित केला आहे.
नायडू पुढे म्हणाले की, राज्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात अल्प होत आहे. गेल्या १० वर्षांत लोकसंख्या १.६ टक्क्यांनी न्यून झाली आहे. यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच अधिकाधिक अपत्यांना जन्म द्या. अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यात पुढच्या २ दशकांत खाणारे अधिक आणि काम करणारे अल्प असतील. (राजा आणि समाज धर्माचरणी आणि साधना करणारा असला, तर तेथील परिस्थितीही अनुकूल होते, असे धर्मशास्त्र सांगते; मात्र नायडू यांना हे ठाऊक नसल्यामुळे ते साधना करण्याऐवजी असे अघोरी उपाय सांगतात ! – संपादक) राज्यातील लोकसंख्येतील ५० टक्के जनता सध्या तरुण आहे. राज्याला तरुण ठेवण्यासाठी जन्मदर वाढवणे आवश्यक आहे.