विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !

साधकांना सूचना आणि कृतीशील धर्मप्रेमींना नम्र विनंती !

‘सध्या लग्नसराई चालू आहे. विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते. आप्तेष्टांच्या विवाह समारंभाला गेल्यावर त्यांना कपडे, भांडी आदी वस्तू भेट स्वरूपात दिल्यास काही वेळा तेही पुन्हा भेटवस्तू (‘रिटर्न गिफ्ट’) देतात.

१. इतरांना भेट देण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ !

सनातनने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी नानाविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ आप्तेष्टांना भेट म्हणून दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत अमूल्य ज्ञान पोहोचेल.

विवाह समारंभात भेट देण्यासाठी उपयुक्त असलेले विविध ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची नावे पुढील सारणीत दिली आहेत. ‘कोणकोणत्या भाषांमध्ये ते उपलब्ध आहेत ?’, त्या भाषेपुढे  अशी खूण केली आहे.

१ अ. ग्रंथ

१ आ लघुग्रंथ

लघुग्रंथ हवे असतील, तर त्या सर्व ग्रंथांच्या पहिल्या पृष्ठावर ‘…. यांच्याकडून सप्रेम भेट !’ अशा आशयाचे लिखाण छापून देता येईल.

१ इ. वरील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या वाचनामुळे आप्तेष्टांना हिंदु धर्मात सांगितलेले विवाहाचे शास्त्र, तसेच अलंकार, मेंदी, रांगोळी, आचारधर्म या संदर्भातील माहिती अवगत होईल.

२. सनातनची सात्त्विक आणि दर्जेदार उत्पादने

सनातनने उदबत्ती, भीमसेनी कापूर, अष्टगंध, कुंकू, दंतमंजन, साबण, उटणे, शिकेकाई चूर्ण आदी नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे गोमूत्र-अर्क, त्रिफळा चूर्ण आदी शुद्ध आयुर्वेदीय उत्पादनेही उपलब्ध केली आहेत. विवाहाच्या निमित्ताने ही उत्पादने इतरांना भेट देऊ शकता.

३. स्थानिक वितरकांकडे ग्रंथ, लघुग्रंथ वा उत्पादने यांची मागणी करा !

नामकरण विधी, वाढदिवस, विवाहाचा वाढदिवस, वास्तुशांत आदी कार्यक्रमांच्या निमित्तानेही सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ वा उत्पादने भेट स्वरूपात देता येतील. भेट देण्यासाठी त्यांची मागणी करायची असल्यास स्थानिक वितरकांशी लवकरात लवकर संपर्क साधावा. हे ग्रंथ आणि लघुग्रंथ https://sanatanshop.com या संकेतस्थळावरून घरबसल्याही खरेदी करू शकतो.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०१८)

साधकांनी वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करून विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने भेट म्हणून देण्यासाठी प्रवृत्त करावे. 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now