रत्नागिरी येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, श्री. प्रमोद मुतालिक आणि श्री. मनोज खाडये

रत्नागिरी, ३० डिसेंबर (वार्ता.) – आज शहरातील मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअममध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. या सभेत गोवा आणि पश्‍चिम महाराष्ट्र धर्मप्रसारक तथा सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, श्रीराम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात राज्य आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी धर्मप्रेमींमध्ये धर्मतेज जागवले.

या सभेचा सविस्तर वृत्तांत लवकरच प्रसिद्ध करत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF