सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य आणि त्याचे आध्यात्मिक विश्‍लेषण

श्री. निषाद देशमुख

१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात होणार्‍या यज्ञांच्या वेळी पुरोहित हवन करत असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ २० – २५ मिनिटे नमस्कार केलेल्या अवस्थेत अगदी स्थिर उभ्या राहतात.’

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वैशिष्ट्याचे आध्यात्मिक विश्‍लेषण

२ अ. यज्ञाच्या वेळी पुरोहित हवन करत असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ स्थिर उभ्या रहाण्यामागील प्रक्रिया : यज्ञाच्या वेळी पुरोहित हवन करत असतांना सद्गुरु बिंदाताई यांची आकाशतत्त्वाशी निगडित ‘तत्क्षण कर्तव्यम्’(त्या परिस्थितीमध्ये ईश्‍वराला अपेक्षित तसे वागणे), अशी स्थिती असते. या स्थितीत त्यांना ‘स्वत: समष्टीला चैतन्य देणारे एक माध्यम आहे ’, अशी सूक्ष्म कर्तव्याची जाणीव निर्माण होते. या कर्तव्याच्या जाणिवेमुळे त्यांच्यातील भक्ती जागृत होऊन देह, मन, चित्त, बुद्धी या सर्वांवर नियंत्रण मिळवते. भक्तीच्या प्रभाव झाल्याने त्यांची बुद्धी शरणागत स्थितीत, मन आणि चित्त समष्टीसाठी प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्‍वराच्या अनुसंधानात, देहातील पंचप्राण समान स्थितीत, तर स्थूलदेह लीनभावात राहून कार्य करतो. याप्रकारे भक्तीच्या बळावर समष्टीला अधिकाधिक चैतन्यप्रदान करणारी समाधी स्थिती त्यांनी गाठलेली असते. स्थिरता आकाशतत्त्वाचा गुणधर्म असून समाधी स्थिती आकाशतत्त्वाशी निगडित असते. यज्ञाच्या वेळी समाधी स्थितीमुळे सद्गुरु बिंदाताई यांंच्यात आकाशतत्त्व वाढून त्याचे स्थिरता गुणधर्म प्रगट झाल्याने त्यांना स्थूलातून २०-२५ मिनिटे स्थिर उभे रहाणे शक्य होते.

२ आ. यज्ञाच्या वेळी सद्गुरु बिंदाताई यांच्या समाधी स्थितीचे लाभ

१. सद्गुरु बिंदाताई यांच्या समाधी स्थितीमुळे ईश्‍वरी चैतन्य अधिक प्रमाणात यज्ञस्थळी आकृष्ट झाल्याने यज्ञाची फलनिष्पत्ती १० टक्क्यांपर्यंत वाढते.

२. सद्गुरु बिंदाताई यांच्या माध्यमातून ५ व्या पाताळपर्यंत चैतन्य प्रक्षेपित केले गेल्याने पाताळातील वाईट शक्तींचे आक्रमण १० टक्क्यांपर्यंत अडवले जातात.

३. सद्गुरु बिंदाताई यांचे वैशिष्ट्य

सद्गुरु बिंदाताई यांचे वैशिष्ट्य दाखवून आणि त्यांच्या आध्यात्मिक विश्‍लेषणाच्या अभ्यासातून ईश्‍वराने आकाशधारणेच्या स्तरावर चालू असलेले त्यांचे कार्य आणि समष्टी भक्तीचे उदाहरण समष्टीला दाखवले आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, नागेशी, गोवा. (१०.११.२०१८, संध्याकाळी ६.३५)


Multi Language |Offline reading | PDF