विवाहित स्त्रीने गळ्याबरोबर कंठमणी आणि हृदयापर्यंत लांबीचे मंगळसूत्र धारण केल्यामुळे तिला होणारे आध्यात्मिक लाभ

‘विवाहित स्त्रीने गळ्यामध्ये कंठमणी आणि अनाहतचक्राला स्पर्श करणारे मंगळसूत्र धारण करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

कु. मधुरा भोसले

१. कंठमणी

कंठमणी हा विशुद्धचक्राला स्पर्श करत असतो. त्यामुळे वाणीच्या शुद्धीची प्रक्रिया सतत चालू असते.

२. मंगळसूत्र

मंगळसूत्राची लांबी गळ्यापासून हृदयापर्यंत असेल, तर मंगळसूत्राच्या वाट्यांचा स्पर्श स्त्रीच्या अनाहतचक्राला होतो. त्यामुळे सोन्याच्या वाट्यांमध्ये कार्यरत असणार्‍या चैतन्याचा स्पर्श अनाहतचक्राला होऊन अनाहतचक्रातील भावना न्यून होऊन भाववृद्धी होते. त्यामुळे स्त्रीला वैवाहिक जीवन आध्यात्मिक स्तरावर जगण्यास साहाय्य मिळते.

हल्ली काहींचे मंगळसूत्र गळ्यापर्यंतच असते. गळ्यापर्यंत असणार्‍या मंगळसूत्रामुळे विशुद्धचक्राच्या भोवती सात्त्विकता आणि चैतन्य यांचे वलय निर्माण होते; परंतु त्या स्त्रियांच्या अनाहतचक्राची जागृती होत नाही आणि त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०१८, रात्री ९.५०)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now