नगर येथील पू. अशोक नेवासकर यांना नाथ संप्रदायातील त्यांचे गुरु थोर विदेही संत प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांनी सूक्ष्मातून आदेश देऊन सनातनच्या साधकांना तांत्रिक मूर्तीची पूजा न करण्याविषयी मार्गदर्शन करण्यास सांगणे

तांत्रिक उपासनेतील मूर्ती

‘सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात देवाची १० सें.मी. उंचीची एक छोटीशी पितळी मूर्ती एका साधकाने अर्पण दिली होती. मूर्तीसंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी तिचे छायाचित्र नगर येथील संत आणि इतिहास संशोधक पू. अशोक नेवासकरकाकांना पाठवले. पू. काकांचा या विषयात गाढा अभ्यास असल्यामुळे छायाचित्र पाहून ती तांत्रिक मूर्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी देहत्याग केलेले नाथ संप्रदायातील त्यांचे सद्गुरु प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांचा पू. काकांना सूक्ष्मातून आदेश झाला. प.पू. देवेंद्रनाथ महाराजांनी ती मूर्ती उग्र आणि भेदक तोंडवळ्याची असून तंत्र उपासनेतील मूर्ती असल्याचे पू. नेवासकरकाकांना सांगितले. ‘तंत्र उपासना ही तमोगुणी असते. ही उपासना योग्य आध्यात्मिक अधिकार असलेल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावी लागते. स्वतःच्या मनाने तंत्र उपासना केल्यास उपासकाची प्राणशक्ती मूर्तीत खेचली जाऊ शकते; म्हणून अशा तांत्रिक मूर्तीची पूजा सनातनच्या साधकांनी करू नये’, अशी माहिती सूक्ष्मातून प.पू. देवेंद्रनाथ महाराजांनी पू. नेवासकरकाकांना दिली.

(सनातन संस्थेमध्ये अशा प्रकारच्या मूर्तींचे पूजन किंवा त्यांची उपासना केली जात नाही. केवळ ‘संशोधनाचा एक विषय’ म्हणून ही मूर्ती आम्ही आश्रमात जतन केली आहे.  संकलक)

पू. (प्रा.) अशोक नेवासकर, नगर

संतांना मृत्यू नसतो. भूलोकातील आपल्या कार्याची स्थुलातून पूर्तता झाल्यावर ते केवळ त्यांच्या स्थूल देहाचा त्याग करतात. अशा देहत्याग केलेल्या संतांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते. वरील प्रसंगातून देहत्याग केलेले; परंतु सूक्ष्मातून सनातनचे कार्य आणि साधक यांवर सातत्याने आपल्या कृपेचा वर्षाव करणारे प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांच्यासारखे काही संत किती बारकाईने साधकांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत, हे लक्षात येते. सनातनवर स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर आपली प्रीती अन् कृपा यांची उधळण करणार्‍या संतांमुळे आज सनातनचे कार्य जगभर पसरून वृद्धींगत होत आहे. यासाठी सर्व संतांच्या चरणी आम्ही कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’

(सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळूरू, कर्नाटक. (१०.११.२०१८, सकाळी ११ वाजता)

साधकांना सूचना !

कोणाच्या देवघरात तंत्र उपासनेतील मूर्ती किंवा देवतेचे चित्र असल्यास साधकांनी त्याची पूजा करू नये. अशा प्रकारची मूर्ती किंवा चित्र याविषयीची माहिती अन् त्याचे छायाचित्र श्री. रूपेश रेडकर यांच्या नावे पुढील पत्त्यावर पाठवावे. पुढे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात अशा प्रकारच्या तांत्रिक मूर्तींचे अथवा चित्रांचे संशोधन अन् अभ्यास करणे शक्य होईल.

संपर्कासाठी पत्ता : सनातन आश्रम, २४/ब, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.

ई-मेल : [email protected] 


Multi Language |Offline reading | PDF