प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांनी गायनसेवा अन् नृत्यसेवा सादर करतांना तेथे उपस्थित असणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती !

११.११.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या भिलई (छत्तीसगड) येथील कु. अंजली कानस्कर (वय १९ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (वय ११ वर्षे) या भगिनींनी कथ्थक, तर रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधिका कु. प्रतीक्षा आचार्य यांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात भगिनी कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी भक्तीगीते गायली. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूतींचा काही भाग आपण गेल्या रविवारच्या अंकात म्हणजेच २३ डिसेंबर २०१८ च्या अंकात पाहिला. आज त्याचा उर्वरित भाग पाहूया.

आधीचा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

३. साधिका नृत्यसेवा सादर करत असतांना उपस्थित साधिकांना आलेल्या अनुभूती

३ उ. तराना

३ उ १. कु. शर्वरी अन् कु. अंजली यांच्याकडून वातावरणात आनंदाचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवणे आणि ‘त्या दोघी भूमीपासून वरच्या पातळीवर नृत्य करत आहेत’, असे वाटणे : ‘तराना’ हा नृत्य प्रकार पहात असतांना कु. शर्वरी आणि कु. अंजली या दोघींकडून वातावरणात मोठ्या प्रमाणात आनंदाचे प्रक्षेपण होत होते. ‘नृत्य करतांना दोघींचा देह हलका झाला असून त्या दोघीही भूमीपासून वरच्या पातळीवर नृत्य करत आहेत’, असे आम्हाला जाणवले.’ – कु. तेजल पात्रीकर आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर

३ उ २. ‘कु. शर्वरी आणि कु. अंजली यांनी हा नृत्यप्रकार केल्यामुळे माझ्यात सकारात्मकता येऊन मला चांगले वाटले.’ – कु. मधुरा चतुर्भुज, कात्रज, पुणे.

(तराना : हा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘गाणे’ किंवा ‘नगमा’ असा होतो. हा ‘ख्याला’प्रमाणेच गायनातील गायकीचा प्रकार आहे. यामधील गायल्या जाणार्‍या बोलांना, उदा. ता, दा, ना, रे, ओदानी, दीम, तनोम इत्यादींना कसलाही भावार्थ, आशय नसतो. तराण्यात स्थायी आणि अंतरा असे दोन भाग असतात. यात भावप्रदर्शनास स्थान नाही. हा मध्य किंवा द्रुत लयीत गायला आणि नाचला जातो.)

३ उ ३. ‘कु. शर्वरी आणि कु. अंजली यांचे नृत्य देवलोकात चालू आहे’, असे वाटणे आणि मन निर्विचार होणे : ‘कु. शर्वरी आणि कु. अंजली कानस्कर या भगिनी नृत्य करत असतांना ‘त्यांचे नृत्य देवलोकात चालू आहे’, असे आम्हाला वाटत होते. त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने येत असल्याचे आम्हाला जाणवत होते. त्यांचे नृत्य पहातांना आमचे मन निर्विचार झाले होते आणि आम्हाला शांत वाटत होते.’ – कु. प्रतीक्षा आचार्य, वैद्या कु. आरती तिवारी आणि कु. मधुरा चतुर्भुज

४. गायन ऐकल्यानंतर उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती

४ अ. ‘सौ. अनघा जोशी यांच्याकडे अवकाशातून पांढरा प्रकाश वेगाने आला’, असे जाणवणे आणि त्यातून ध्यानस्थिती अनुभवणे : ‘नृत्याचा कार्यक्रम संपल्यावर प.पू. देवबाबांनी सौ. अनघा जोशी यांना गायन करण्यास सांगितले. गायनासाठी सौ. अनघा व्यासपिठावर बसताच ‘त्यांच्याकडे अवकाशातून पांढरा प्रकाश वेगाने आला’, असे मला जाणवले. त्यातून मी ध्यानस्थिती अनुभवली.

४ आ. कु. तेजल पात्रीकर ‘गोरखकल्याण’ या रागातील ‘गुरुचरणनन सो लागी…’ हे गीत गात असतांना ध्यान लागणे, आश्रमाच्या परिसरात साप येऊन नंतर निघून जाणे, प.पू. देवबाबांनी ‘गोरखकल्याण राग आणि साप यांचा संबंध आहे’, असे सांगणे : त्यानंतर प.पू. देवबाबांनी कु. तेजल पात्रीकर यांना गायन करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी प्रथम ‘गोरखकल्याण’ या रागातील ‘गुरुचरणनन सो लागी…’ हे गीत सादर केले. ते ऐकतांना माझे ध्यान लागले. कु. तेजल यांच्या गायनाच्या वेळी सभागृहाच्या बाहेर साप आला होता. तो तेथील परिसरात फिरून निघून गेला. प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘गोरखकल्याण राग आणि साप यांचा संबंध आहे. या रागाचे चलनही सर्पाकृती वक्र आहे. ‘साप येणे’, हा त्याचाही परिणाम आहे. ‘प्राण्यांनाही संगीत प्रिय असते’, हे ऐकले होते. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याने मला अधिक आनंद झाला.’

– वैद्या कु. आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. ‘समाजात लोकांसमोर नृत्य सादर करणे आणि प.पू. देवबाबांच्या आश्रमात त्यांच्यासमोर नृत्य करणे’, यांत जाणवलेला भेद

‘आम्ही प.पू. देवबाबांंच्या आश्रमात पोहोचल्यावर ‘गोकुळात आलो आहोत’, असेच आम्हाला वाटत होते. ‘त्यांच्यासमोर नृत्य सादर करण्याची संधी मिळाली’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा यांच्या चरणी कृतज्ञता !’

– कु. शर्वरी, कु. अंजली आणि सौ. अनुपमा कानस्कर (२५.११.२०१८)

(समाप्त)  


Multi Language |Offline reading | PDF