दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल यांनी चौकशीत सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची ‘ईडी’ची माहिती

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याचे प्रकरण

अनेक घोटाळ्यात गांधी घराण्याशी निगडित व्यक्तींची नावे पुढे येतात; मात्र भविष्यात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. या प्रकरणात तरी संबंधितांवर कारवाई होणार का ?

नवी देहली – ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल यांनी कोठडीत सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) न्यायालयात दिली. मिशेल यांना प्रत्यार्पणाद्वारे दुबईतून भारतात आणण्यात आले होते. त्यांना ७ दिवस ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना २९ डिसेंबरला पतियाळा न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यावर ईडीने ही माहिती न्यायालयात दिली.

ईडीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार मिशेल यांनी सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे; पण ते कोणत्या संदर्भात घेतले आहे हे आताच सांगू शकत नाही. ‘इटलीच्या असणार्‍या महिलेच्या मुलाने तो देशाचा भावी पंतप्रधान होईल’, असे सांगितले होते’, अशी माहितीही मिशेल यांनी दिली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now