यंदा कोरेगाव भीमा येथे आक्षेपार्ह पुस्तकविक्रीवर पोलिसांचे लक्ष

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची सरकार अन् पोलीस प्रशासन यांच्याकडून नोंद

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना असे निवेदन सरकारला का द्यावे लागते ? सरकारच्या हे का लक्षात येत नाही ?

पुणे – कोरेगाव भीमा येथे होणार्‍या पुस्तकविक्रीवर यंदा पोलीस लक्ष ठेवणार असून संवेदनशील साहित्याची विक्री होऊ नये, यासाठी विशेष अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे. १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. या एल्गार परिषदेमध्ये (एल्गार म्हणजे निकराचा लढा) ‘शिवाजीचे उदात्तीकरण – पडद्यामागील वास्तव’ या डॉ. विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या आक्षेपार्ह पुस्तकाची विक्री करण्यात आली होती. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अतिशय अवमानकारक लिखाण केलेले असून समाजात तेढ निर्माण होईल, अशी जातीयवादी आणि विद्वेषी मांडणी लेखकाने केली आहे. हिंदु जनजागृती समितीने या विषयाच्या संदर्भात सरकारदरबारी निवेदने देऊन ‘या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी आणि लेखक अन् प्रकाशक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या संदर्भात सांगितले की, काही पुस्तकांमध्ये विखारी लिखाण असते. अशी पुस्तके विकता येऊ शकत नाहीत. अशा पुस्तकांवर बंधने आणणेच आवश्यक आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now