आसाममधील एआययूडीएफ् पक्षाचे प्रमुख बद्रूद्दीन अजमल यांच्याकडून पत्रकारांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी

हे कृत्य जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या नेत्याने केले असते, तर निधर्मीवादी पत्रकारांनी राळ उठवली असती; मात्र धर्मांध नेत्याने अशी कृती केल्यामुळे निधर्मी पत्रकार त्याकडे दुर्लक्षच करणार, हे लक्षात घ्या !

गुवाहाटी (आसाम) – आसाममधील एआययूडीएफ् (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) पक्षाचे प्रमुख बद्रूद्दीन अजमल यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला शिवीगाळ करत डोके फोडण्याची धमकी दिली. याविषयी पत्रकाराने पोलिसांत तक्रारही केल्यानंतर अजमल यांनी क्षमायाचना केली आहे.

या पत्रकाराने, ‘वर्ष २०१९ च्या निवडणुकीत तुमचा पक्ष कोणाशी युती करणार?’, असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर अजमल यांनी ‘भाजपच्या विरोधातील महायुतीमध्ये सहभागी होणार’, असे सांगितले. त्यावर पत्रकाराने, ‘निवडणुकीनंतर जो पक्ष जिंकणार त्याच्यासमवेत तुम्ही जाणार का?’, असा प्रश्‍न केला. त्यामुळे अजमल संतप्त झाले आणि त्यांनी पत्रकाराला शिवीगाळ करण्यास चालू केले. तसेच अन्य एका पत्रकाराकडील ध्वनीक्षेपक हिसकावून संबंधित पत्रकाराला मारण्याचा प्रयत्न केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now