विश्‍वाच्या कल्याणासाठी सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता ! – डॉ. मकरंदबुवा सुमंत

सातारा, २८ डिसेंबर (वार्ता.) – समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्याजवळ सर्व जाती-धर्माचे लोक येत असत. आज मात्र सर्वत्रच जाती-धर्माच्या भिंती घातल्या आहेत. आज विश्‍वकल्याणासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन समर्थ साहित्याचे अभ्यासक कीर्तनकार डॉ. मकरंदबुवा सुमंत यांनी केले. नीरा येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.  (छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण हयात यवनांना तळपत्या तलवारीने पाणी पाजून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हा इतिहासही सांगणे अपेक्षित आहे. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF