बसगाडी मिळण्याच्या असुविधेमुळे विद्यार्थ्यांचे सातारा बसस्थानकातच आंदोलन

जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल !

सातारा, २८ डिसेंबर (वार्ता.) – अंगापूर (सातारा) येथे पहाटे ६ वाजता येणारी एस्.टी. बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच नोकरदार वर्गाचीही मोठी असुविधा होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सातारा मध्यवर्ती बसस्थानकातच ठिय्या आंदोलन केले. (‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद मिरवणार्‍या एस्.टी. साठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पद ! – संपादक)

अनेक वेळा तोंडी, तसेच लेखी सूचना करून झाल्या. ग्रामसभेत ठराव घेऊन त्याची प्रत आगारप्रमुखांना देऊनही त्यावर कोणतीही कृती केली जात नाही. विद्यार्थ्यांना ५ किलोमीटर पायी चालत जावे लागते, तर काहींना मासिक पास काढूनही पदरमोड करून प्रवास करावा लागतो. यामुळे होणारे आर्थिक, शैक्षणिक नुकसान तसेच होणार्‍या मानसिक त्रासाला उत्तरदायी कोण, असे प्रश्‍न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले गेले.


Multi Language |Offline reading | PDF