(म्हणे) ‘भारतात अल्पसंख्यांकांना बरोबरीचे समजले जात नाही !’

इम्रान खान यांची परत अल्पसंख्यांकांवरून भारतावर टीका

‘खोटे बोला पण रेटून बोला’ या वृत्तीचे इम्रान खान ! पाकमध्ये अल्पसंख्यांकांची स्थिती काय आहे, हे जगाला ज्ञात आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या विधानाचेच हसे होत आहे !

इस्लामाबाद – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘अल्पसंख्यांकांना कसे वागवायचे हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवून देऊ’, असे विधान केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी २५ डिसेंबरला महंमद अली जिना यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्वीटद्वारे म्हटले आहे की, भारतात बहुसंख्य हिंदूंकडून मुसलमानांना बरोबरीचे नागरिक समजत नसल्याचे लक्षात आल्यावर मुसलमानांना वेगळा देश बनवण्याचा संघर्ष जिना यांनी चालू केला होता. (बरोबरीचा समजत नसल्यामुळे नव्हे, तर धर्माच्या नावाने जिना यांनी पाकिस्ताची मागणी केली होती. त्यासाठी १० लाखांहून अधिक हिंदूंची धर्मांधांनी कत्तल केली, तर लक्षावधी महिलांवर बलात्कार झाले; मात्र मृत्यूच्या वेळी जिना यांना पाकमधील धर्मांध नेत्यांच्या वागणुकीवरून पाकच्या निर्मितीचा पश्‍चात्ताप झाल्याचे दिसून आले. आज त्याच धर्मांध नेत्यांमुळे पाकची अधोगती झाली आहे, हे इम्रान खान लक्षात घेणार नाहीत ! – संपादक) पाकिस्तान जिनांचा आहे. आम्ही हे कटाक्षाने पहातो की, येथे अल्पसंख्यांकांना बरोबरीचे समजले जाईल; मात्र तसे भारतात होत नाही.’

माजी भारतीय क्रिकेट खेळाडू महंमद कैफ यांनी ट्वीट करतांना म्हटले आहे की, फाळणीच्या वेळी पाकमध्ये २० टक्के अल्पसंख्यांक होते आणि ते २ टक्क्यांंपेक्षा अल्प आहेत. त्याच वेळी भारतात अल्पसंख्यांकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी या विषयावर भारताला बोलू नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now