३ मंदिरे लवकर उभारा अन्यथा गमावलेली ४० सहस्र मंदिरे घेऊ ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

मुंबई – श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर अनेक परकीय आक्रमकांनी वारंवार पाडले. केवळ राममंदिर नव्हे, तर भारतातील अशी अनुमाने ४० सहस्र मंदिरे मुसलमान आक्रमकांनी पाडली. लवकरात लवकर अयोध्येतील राममंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर आणि वाराणसी येथील काशीविश्‍वनाथ या तीनही मंदिरांचा मूळ स्वरूपात जीर्णोद्धार करावा अन्यथा आम्ही गमावलेली सर्व ४० सहस्र मंदिरे परत मिळवू, असे खडे बोल राज्यसभेतील भाजपचे खासदार तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी एका  कार्यक्रमात मंदिरविरोधकांना सुनावले. दादर येथील हिंदु नववर्ष स्वागत समिती आयोजित  एका कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. स्वामी पुढे म्हणाले, ‘‘भारतात देवता, धर्मस्थळे, धर्मग्रंथ अनेक असल्याने भारत हा एक देश नाही, असाच समज इंग्रजांनी रूढ केला; मात्र हे सत्य नाही. जेव्हा जेव्हा देशावर अरिष्ट आले, तेव्हा हा संपूर्ण देश एक झाला आहे. आज नव्या भारताला आपलाच इतिहास नव्याने सांगायची आवश्यकता आहे. इथे येणार्‍यांना आम्ही शांतपणे आमच्यात सामावून घेतले; मात्र आता डाव्या विचारसरणीचे लोक आम्हाला ‘सेक्युलॅरिझम’ शिकवत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now