काटोल (जिल्हा नागपूर) येथे धर्माचार्य ह.भ.प. माऊली महाराज मुरेकर यांची नागपूर येथे पोलिसांत तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचे दहन केल्याचे प्रकरण

धर्महानीविषयी जागृत होऊन ठिकठिकाणी तक्रारी प्रविष्ट करणार्‍या वारकर्‍यांकडून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सर्वत्रचे हिंदू बोध घेणार का ?

काटोल (जिल्हा नागपूर), २८ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचे दहन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या, तसेच हा ग्रंथ जाळत असतांना नवाब मलिक यांनीही समर्थन दिले. हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थन करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी काटोल पोलीस ठाण्यात राष्ट्रीय वारकरी परिषदेचे नागपूर जिल्हाप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. माऊली महाराज मुरेकर यांनी २६ डिसेंबरला तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, अन्य धर्मियांप्रमाणे हिंदूंनाही न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. ह.भ.प. माऊली महाराज मुरेकर यांनी यापूर्वी वर्धा येथेही तक्रार प्रविष्ट केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF