१२ जानेवारीपर्यंत कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाची जागा सरकारच्या कह्यात

पुणे – मागील वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर विजयस्तंभ आणि परिसरातील भूमी कह्यात मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने न्यायालयाकडे केली होती. ती मान्य केल्याने संबधित भूमी २२ डिसेंबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ या कालावधीत सरकारच्या कह्यात असणार आहे. बाळासाहेब जमादार यांचे पूर्वज खंडोजी जमादार यांना विजयस्तंभाजवळील भूमी देखरेखीसाठी देण्यात आली होती; मात्र याविषयी राज्य सरकार आणि खासगी भूमीमालक यांच्यात वाद चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF