प्राध्यापिका अभ्यासावरून ओरडल्याने विद्यार्थ्याने त्यांचा क्रमांक अश्‍लील संकेतस्थळावर अपलोड केला

कर्णावती – येथे एका ४० वर्षीय महिला प्राध्यापिकेचा भ्रमणभाष क्रमांक अश्‍लील संकेतस्थळावर टाकणार्‍या २४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. अभ्यासात लक्ष नसल्यामुळे ४ मासांपूर्वी या प्राध्यापिका या विद्यार्थ्याला ओरडल्या होत्या. त्याचा राग ठेवून सूड घेण्याच्या उद्देशाने त्याने असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले. प्राध्यापिकेला अनेक अश्‍लील भ्रमणभाष आणि इमेल येऊ लागल्यावर तिने पोलिसांत तक्रार केली होती. (धर्मशिक्षणाच्या अभावाचे फलित ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now