कोपरगाव येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

अधिवक्त्यांशी चर्चा करतांना १. श्री. सुनिल घनवट

कोपरगाव (नाशिक) – येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन करण्याचा आणि सभेला सर्वतोपरी साहाय्य करण्याचा निर्धार येथील हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट हे नुकतेच कोपरगाव येथे आले असतांना स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी त्यांची भेट घेतली. येथे फेब्रुवारी मासात होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त घनवट यांनी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्र आणि धर्म प्रेमी उद्योजक, तसेच अधिवक्ता यांची भेट घेऊन सध्याच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या स्थितीविषयी चर्चा केली.

येथे आयोजित हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत त्यांनी सध्याच्या राष्ट्र-धर्म स्थितीविषयी हिंदुत्वनिष्ठांशी संवाद साधला. श्री. घनवट या वेळी म्हणाले, ‘‘उल्हासनगर येथे आज मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर चालू आहे. अगदी उच्चभ्रू वस्तीमध्ये धर्मांतर वाढलेले आहे. आपण जर जागृत आणि संघटित झालो नाही, तर मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर हे असेच चालू राहील. यासाठी हिंदूंनी आता जागृत आणि संघटित व्हायला हवे.’’ राष्ट्ररक्षण आणि धर्मजागती यांच्या कार्यात आपण कसे सहभागी होऊ शकतो याविषयीही श्री. घनवट यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी आणि अधिवक्त्यांनी ‘कोपरगाव येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या नियोजनात सक्रीय सहभागी होऊ’, असे सांगितले.

येथील शिवसेना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गावोगाव जाऊन प्रसार करण्याचे दायित्व घेतले, तसेच शिवजागरण विचार मंचचे अजय सुपेकर अमोल गायकर यांनी सभेसाठी ५ सहस्र हस्तपत्रके छापून घेण्यास सांगितले, तसेच योग वेदांत सेवा समितीचे श्री. रघुनाथ यांनी ‘सभेचे निमंत्रण देण्यासाठी पाच सहस्र हस्तपत्रके छापून देऊ’ असे सांगितले. तसेच ‘कोपरगाव शिवसेना ऑटो रिक्शा’च्या वतीने सभेच्या आधी ‘प्रत्येक रिक्शाला भगवा ध्वज लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ’ असे शिवसेना महिला आघाडीच्या सौ. पुंड यांनी सांगितले. सभेपर्यंत प्रत्येक रविवारी एकत्र येण्याचा सर्वांनी निर्धार केला आणि सभेसाठी आतापासूनच प्रसार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वांनी ठरवले. या बैठकीला ६० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now