छत्तीसगडमधील काँग्रेसच्या मंत्रीमंडळात अशिक्षित मंत्र्याचा समावेश

  • लोकशाहीची निरर्थकता दर्शवणारी घटना !
  • एकीकडे भारत २१ व्या शतकात महासत्ता होण्याचे स्वप्न पहात असतांना दुसरीकडे अशिक्षित लोक मंत्री बनत आहेत, हे भारताला लज्जास्पद !

 

काँग्रेसचे कवासी लखमा हे शपथ वाचू शकले नाहीत

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील ९ मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. या सर्वांना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली. यात कवासी लखमा हे शपथ वाचू शकले नाहीत. त्यामुळे राज्यपाल सांगत होत्या, तसे लखमा म्हणत होते. लखमा हे अशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. अनुसूचित जातीमधील असणारे लखमा हे म्हणाले की, त्यांनी कधीही शाळेत जाऊन शिक्षण घेतलेले नाही. लखमा छत्तीसगड राज्याच्या स्थापनेपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी विदेश यात्राही केली आहे. ते पूर्वी उपविरोधी पक्षनेतेही होते.


Multi Language |Offline reading | PDF