दहेगाव (जिल्हा वर्धा) येथे धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर यांची वर्धा येथे पोलिसांत तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचे दहन केल्याचे प्रकरण

धर्महानीच्या विरोधात तात्काळ वैध मार्गाने कृती करणारे धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून सर्वत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा !

पोलिसांना तक्रार अर्ज देतांना माऊली महाराज मुरेकर आणि त्यांचे सहकारी

दहेगाव (जिल्हा वर्धा), २६ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी २ दिवसांपूर्वी मनुस्मृतीचे दहन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी दहेगाव पोलीस ठाण्यात राष्ट्रीय वारकरी सेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर आणि त्यांचे सहकारी यांनी तक्रार दिली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की,

१. छगन भुजबळ यांनी हिंदूंचा धार्मिक ग्रंथ जाळून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

२. सध्या कुठेही मनुस्मृतीनुसार राज्यकारभार केला जात नसतांना जाणूनबुजून अन्य धर्मियांचे लांगूलचालन करण्यासाठी भुजबळ हिंदूंचा अपमान करत आहेत.

३. मनुस्मृती ग्रंथामध्ये कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा उल्लेख नाही, केवळ जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भुजबळ यांचा प्रयत्न आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now