हिंदु धर्माविषयी लोकांना जागृत करण्यासाठी अमेरिकेत ‘आय एम् हिंदु’ चळवळीला प्रारंभ

  • धार्मिक आधारावरून होणारा हिंदूंचा छळ थांबवण्यासाठी ‘हिंदु अमेरिकन फाऊन्डेशन’चा उपक्रम अमिरिकेत हिंदु धर्माविषयी जागृती करणार्‍या ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ चे अभिनंदन !
  • विदेशात धार्मिक आधारावर हिंदूंचा छळ होणे, हे हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले भाजप सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यासाठी लज्जास्पद !

ह्यूस्टन (अमेरिका) – अमेरिकेत धार्मिक आधारावरून होणारा हिंदूंचा छळ  थांबवण्यासाठी ‘आय एम् हिंदु’ नावाने एका राष्ट्रव्यापी चळवळीला प्रारंभ करण्यात आला आहे. या चळवळीच्या माध्यमातून हिंदु धर्माविषयी येथील लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. ही चळवळ अमेरिकेतील ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ (एच्.ए.एफ्.) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने चालू केली आहे. ही संघटना हिंदु धर्माविषयी लोकांच्या मनात असलेला अपसमज सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

या चळवळीविषयी ‘एच्.ए.एफ्.’चे कार्यकारी संचालक सुहाग शुक्ला यांनी  सांगितले, ‘‘हिंदु हा अमेरिकेतील सर्वाधिक यशस्वी अल्पसंख्यांक समाज समजला जातो. असे असतांनाही लोकांच्या मनात हिंदू आणि हिंदु धर्म यांविषयी अतिशय अल्प माहिती आहे. त्यामुळे स्थानिकांकडून येथील भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धांवरून घाबरवण्याच्या किंवा धमकावण्याच्या घटना नेहमी घडत असतात. प्रत्येक ३ भारतीय विद्यार्थ्यांपैकी एकाला अशा छळाला समोर जावे लागते.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now