श्रीलंकेत ख्रिस्त्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमण !

जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाहीत, तिथे श्रीलंकेतील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कोलंबो – श्रीलंकेच्या मन्नार जिल्ह्यातील पुढुक्कुदिइरुप्पु गावामध्ये ख्रिस्ती धर्मगुरु फादर डेस्मन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० ख्रिस्त्यांनी ५० हिंदु कुटुंबांवर आक्रमण केले. ख्रिस्त्यांनी लाठ्याकाठ्यांसह केलेल्या या आक्रमणात अनेक हिंदू घायाळ झाले.

मासेमारीचा व्यवसाय करणार्‍या या बेघर गरीब हिंदु कुटुंबांचे तसेच सुमारे २०० ख्रिस्त्यांचेही नुकतेच येथील नवीन वसाहतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते, तसेच मासेमारी करणार्‍या या वसाहतीमध्ये १ एकर जमीन  हिंदु आणि ख्रिस्ती समुदायांना समान जागेमध्ये प्रार्थनास्थळे उभारण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. ख्रिस्त्यांकडून अर्ध्या एकर जागेमध्ये अन्नाई वेलंकणीचे चर्च उभारण्यात आले. काही दिवसांनी हिंदू त्यांना राखीव ठेवण्यात आलेल्या जागेत मंदिर उभारू लागले, तेव्हा ख्रिस्त्यांनी त्याला विरोध केला आणि संपूर्ण जागेभोवती कुंपण घालणे चालू केले. तेव्हा हिंदूंनी अर्ध्या जागेत कुंपण घालण्यासाठी सामान आणले. तेव्हा फादर डेस्मन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० ख्रिस्त्यांनी हिंदूंवर आक्रमण केले आणि लाकडी काट्यांनी मारहाण केली. हिंदूंनी प्रतिकार न करता जवळचे पोलीस ठाणे गाठले आणि मारहाणीविषयी तक्रार केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या जागेत हिंदूंना मंदिर उभारण्यास विरोध न करण्याचे ख्रिस्त्यांना सुनावले; मात्र ख्रिस्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून विरोध चालूच ठेवला. तेव्हा हिंदूंनी विभागीय सचिव श्री. वसंतकुमार यांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांनी घटनास्थळी येऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता ख्रिस्त्यांनी त्यांनाही धमकावले आणि परतवून लावले. (जगभरातील अल्पसंख्यांक हिंदूंना धर्माविषयी किती अडचणींना सामोरे जावे लागते, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now