पनवेलमधील ख्रिस्ती शाळांतील अपप्रकार आणि भरमसाठ शुल्क यांनी पालक त्रस्त !

ख्रिस्ती धर्मप्रसारक शाळा म्हणजे ‘नाव मोठे लक्षण खोटे !’

श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बेथनी कन्व्हर्ट स्कूल, कोळखे व्हिलेज; कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूल, कळंबोली; सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कळंबोली; सेंट जोसेफ स्कूल, न्यू पनवेल आणि मेरी माथा कन्व्हर्ट प्ले स्कूल ही आहेत पनवेल परिसरातील ख्रिस्त्यांच्या (कॉन्व्हेंट) काही शाळांची नावे.

ख्रिस्त्यांच्या शाळेत अर्धा घंटा बलपूर्वक येशूची प्रार्थना म्हणायची आणि पनवेलमधील पंचायत समितीच्या परिसरातील शाळांत मात्र देवतांच्या पूजेला बंदी !

पनवेल येथील ख्रिस्त्यांच्या या शाळांमध्ये अनुमाने अर्धा घंटा येशूची प्रार्थना चालतेे आणि पनवेल पंचायत समितीच्या वतीने ५ सप्टेंबर २०१८ या दिवशी परिपत्रक काढून शाळांमध्ये देवतांची पूजा आणि श्री सत्यनारायणपूजा करण्यास प्रतिबंध घालणारा तुघलकी फतवा काढण्यात आला आहे. म्हणजे हिंदु मुलांवर हिंदु धर्माचे संस्कार करण्यास बंदी आणि जी हिंदु मुले ख्रिस्त्यांच्या शाळेत जातात त्यांचे एकप्रकारे वैचारिक धर्मांतरच होत आहे. हा विरोधाभास लक्षात घेतला पाहिजे. ख्रिस्त्यांच्या शाळेत मुलांना बायबलही दिले जाते, असे समजते.

एका ख्रिस्ती शाळेविरोधात पालकांनी आंदोलने करूनही शुल्कवाढीच्या संदर्भात काहीच परिणाम नाही !

सेंट जोसेफ शाळेचे शुल्क ४० सहस्र रुपये असून त्याच्या पावत्या अन्य संस्थांच्या नावाने दिल्या जातात. यातील विद्यार्थ्यांचे पालक गेल्या ४ वर्षांपासून या शाळेतील मनमानी शुल्कवाढीच्या विरोधात आणि वाटेल तसे पैसे उकळण्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी पनवेल येथे १४ सप्टेंबर २०१८ ला आमदार प्रशांत ठाकूर यांना समवेत घेऊन आंदोलन केले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या शाळेच्या मालक पिंटो यांना शुल्क अल्प करण्यास सांगितले होते; परंतु प्रत्यक्ष शिक्षणमंत्र्यांनी सांगूनही पिंटो यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. या शाळेतील सर्व तुकड्यांसाठी खेळ, स्नेहसंमेलन आदी उपक्रम घेतले जात नसल्याचीही पालकांची तक्रार आहे.

कळंबोली येथील रेयॉन इंटरनॅशनल शाळेत बसच्या शुल्कासाठी अन्य संस्थेची पावती दिली जाते. येथीलच एका कॉन्व्हेंट शाळेत जनरेटर जळल्याने ३ दिवस वीज नव्हती. त्यामुळे त्या शाळेने प्रत्येक मुलाला ५०० रुपये आणायला सांगितले, असे समजते. अशा प्रकारे विविध कारणांसाठी ख्रिस्ती शाळा पैसे उकळतात.

ख्रिस्त्यांच्या शाळांतून शिक्षकांच्या गुणवत्तेअभावी हीन दर्जाचे शिक्षण !

गणितात पीएच्डी असलेल्या एका गृहस्थांच्या पाल्याने वडिलांनी शिकवल्याप्रमाणे गणित सोडवल्यावर खारघरमधील एका ख्रिस्ती शाळेत त्याला ६ ऐवजी २ गुण देण्यात आले. याविषयी पालकांनी शिक्षकांना विचारल्यावर शिक्षकांनी ‘ही पद्धत अयोग्य आहे’, असे सांगितले. त्यावर वडील शिक्षकांना म्हणाले, ‘‘तुम्ही हे सिद्ध करून दाखवा की, ही पद्धत चुकीची आहे.’’ त्यानंतर पालकांना संबंधित शिक्षिका केवळ १२ वी पास असल्याचे समजले. त्यामुळे येथील शिक्षकांकडे अध्यापन अभ्यासाचे (बीएड्) प्रमाणपत्र आहे कि नाही याविषयीही शंका येते. यावरून कशा गुणवत्तेचे शिक्षण या शाळांतून मुलांना मिळत असेल, याची कल्पना येते. म्हणजे एकीकडे भरमसाठ शुल्क आकारून शिक्षण देण्यासाठी मुलांना ख्रिस्ती शाळांमध्ये घालणे दुसरीकडे शिक्षकही त्या क्षमतेचे नसणे यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावलेला असण्याचीच शक्यता बळावते.

ख्रिस्ती शाळांतून होणारे पाश्‍चात्त्य कुसंस्कार !

सेंट जोसेफ स्कूलमध्ये दहावीच्या मुलांना ‘निरोप’ (सेंडऑफ) म्हणून सहलीप्रमाणे बरेच लांबच्या ठिकाणी नेले जाते. याची खरोखरच आवश्यकता असते का ? काही दिवसांपूर्वी या शाळेत मुलींनी बांगड्या, टिकल्या, पैंजण घालू नये असा तुघलकी फतवा काढण्यात आला होता; मात्र पालकांनी याला विरोध केल्यावर त्याला अनुमती देण्यात आली. या शाळांमध्ये हिंदूंचे कुठलेही सण साजरे केले जात नाहीत; मात्र नाताळ मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याचाच अर्थ सर्वश्रेष्ठ हिंदु धर्माविषयीचे कुठले संस्कार तर सोडाच उलट त्याविषयी द्वेषभावना या शाळा निर्माण करतात; एवढेच नव्हे, तर पाश्‍चात्त्य कुसंस्कारांना या शाळांतील मुले जलद बळी पडतात, असेही लक्षात आले आहे.

वरील सर्व उदाहरणे पहाता कॉन्व्हेंट शाळा म्हणजे निवळ ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ असल्याचीच प्रचीती येते !

पनवेलकरांनो, पाश्‍चात्त्य संस्कार करून हीन दर्जाचे शिक्षण देणार्‍या ख्रिस्ती शाळांत पाल्यांना घालायचे का ते ठरवा !

मान्यवर काय म्हणतात…?

पनवेल येथील चर्चच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करून विदेशातून पैसा येणार्‍या चर्चच्या चालकांवर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करण्यात यावा ! – श्री. अजयसिंग सेंगर, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन, पनवेल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर होणे चिंतनीय. याचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी सनातन प्रभात वाचा ! – रायगडभूषण, कीर्तनकार ह.भ.प. श्रीराम चितळे, पनवेल

आपण अनादी काळापासून हिंदु आहोत. हिंदु धर्म टिकला पाहिजे. भूलथापा मारणारे ख्रिस्ती धर्मप्रसाराला येतात, त्यांना आम्ही निक्षून सांगू की, तुम्ही आमच्या भागात येऊ नका !  – ह.भ.प. नामदेव नाईक, जावळे, तालुका उरण, जिल्हा रायगड

सेंट जोसेफसारख्या ख्रिस्ती शाळांच्या माध्यमातून हिंदूंवर अत्याचारच ! – विक्रांत पाटील, उपमहापौर, पनवेल

पनवेलमध्ये धर्मांतराचे प्रस्थ वाढत आहे. येथील ख्रिस्ती शाळांचाही त्याला हातभार लागत आहे. सेंट जोसेफ शाळेत ८ सहस्रांपैकी केवळ ५०० विद्यार्थी ख्रिस्ती आहेत. बाकी सर्व हिंदु आहेत. अल्पसंख्यांक मान्यतेसाठी निम्मे विद्यार्थी त्या पंथाचे असावे लागतात; परंतु या शाळेने अल्पसंख्यांक नावाखाली मान्यता घेतली आहे. अल्पसंख्यांक मान्यतेमुळे शाळेवर कोणतेच कायदे लागू होत नाहीत. त्यांच्यावर तक्रारही प्रविष्ट होत नाही. ही शाळा धर्मादाय संस्था म्हणून चालवली जाते त्यामुळे सिडकोकडून धर्मादाय संस्थेला १० टक्के अल्प दराने दिला जाणारा भूखंड घेतला आहे. मराठी शाळा चालू करतो असे सांगूनही न करून दिशाभूल केली आहे. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार घेऊन गेल्यास तेथे पोलीस अगोदर पोहोचतात. शाळेत पालकांना येण्यास बंदी आहे. पिंटो प्रशासन पालकांवर अत्याचार करत आहे. शाळेच्या बसमध्ये साहाय्यक नसतो. अनेक बसगाड्यांना मान्यताच नाही. नवशिके चालक बसगाड्यांवर ठेवले जातात. प्रत्येक शाळेनुसार या शाळेनेही प्रतीवर्षी RTE (राईट टू एज्यूकेशन) ही मान्यता घेणे क्रमप्राप्त आहे; मात्र वर्ष २०१५ पासून शाळेने ती घेतलेली नाही. त्यामुळे शाळा अनधिकृत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक असून त्यासाठी जनजागृती करावी लागेल ! – रामदास शेवाळे, शहरप्रमुख, शिवसेना

ख्रिस्ती मिशनरी गोरगरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. सरकारने अशा प्रकारे फसवून धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांवर कारवाई केली पाहिजे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात सनातन संस्थेसह अन्य समविचारी संघटना उत्तम प्रकारे जनजागृतीचे कार्य करत आहेत. हिंदूंना जागे करण्याचे चांगले काम सनातन संस्था करत आहे; परंतु सनातन संस्थेचा नाहक छळ करण्याचे राजकीय षड्यंत्र चालू आहे, ही खेदाची गोष्ट आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांसमवेत जेव्हा डोक्यावरून पाणी जाईल, तेव्हा सरकार जागे होणार आहे का ? ख्रिस्ती शाळांमध्ये हिंदु धर्माच्या परंपरांचे पालन करण्याविषयी बंधने घालण्यात आली होती. या संदर्भात काही पालकांनी आपल्याकडे तक्रारी केल्यावर त्या त्या वेळी असे प्रकार आपण रोखले आहेत. या सर्व गोष्टींना पायबंद बसावा यासाठी धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक असून त्यासाठी सर्व समाजात जनजागृती करावी लागेल. याकरिता आमचाही आपणाला सक्रीय पाठिंबा असणार आहे.

कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात धर्मप्रसार करणार्‍या ख्रिस्त्यांना रोखून रुग्णांचे प्रबोधन करणार्‍या सौ. कमल शिंदे !

कळंबोली (नवी मुंबई) येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात काही ख्रिस्ती धर्मप्रसारक रुग्णांचे धर्मांतर करण्यासाठी उघडपणे येत असल्याचे नवीन पनवेल येथे रहाणार्‍या सौ. कमल शिंदे (वय ६४ वर्षे) यांच्या लक्षात आले. २ वर्षांपूर्वी त्यांचे पती रुग्णाईत असल्याने महात्मा गांधी रुग्णालयात भरती होते. त्या वेळी तिथे एक ख्रिस्ती काही धर्मप्रसाराची पुस्तके घेऊन आला आणि प्रत्येक विभागापर्यंत रुग्णांकडे जाऊन तो काही तरी माहिती सांगत होता, असे सौ. शिंदे यांच्या लक्षात आले. त्या वेळी सौ. शिंदे यांनी त्या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला हटकले आणि जाब विचारला. सौ. शिंदे त्याला म्हणाल्या, ‘‘तुम्ही येथे कशाला आला आहात. आमच्या धर्माचीही पुस्तके आहेत. आमचा धर्म महान आहे. तुम्ही अशा प्रकारे हिंदूंमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसार करू नका. येथून ताबडतोब निघून जा.’’ त्यामुळे त्याने तेथून काढता पाय घेतला. सौ. शिंदे यांनी त्यांच्या विभागातील रुग्णांचेही प्रबोधन केले. त्यांना सांगितले की, ‘‘हा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका.’’

पनवेल शहरातील ‘मेन्स स्टुडिओ’च्या मालकांनी प्रबोधनानंतर दुकानाबाहेरील पुतळ्यांच्या ख्रिस्ती टोप्या उतरवल्या !

हिंदूंनो, धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या कृतींतूनही धर्महानी होऊन पाप लागते. त्यामुळे धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या कृती टाळा !

पनवेल येथील ‘मेन्स स्टुडिओ’च्या मालकांचे अभिनंदन !

जुने पनवेल येथील पुरुषांच्या कपड्यांचे ‘मेन्स स्टुडिओ’ हे दुकान आहे. नाताळ सण जवळ आल्याने दुकानाबाहेरील पुरुषांच्या पुतळ्यांना दुकान मालकांनी लाल टोप्या घातल्या होत्या. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी या दुकानाच्या मालकांशी संवाद साधून त्यांचे प्रबोधन केले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, ‘‘पनवेल भागातच नव्हे, तर संपूर्ण भारतभर प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र चालू आहे. अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या नाताळ सणाच्या टोप्या आपण घालणे म्हणजे आपली संस्कृती सोडून ख्रिस्त्यांचे अनुकरण करण्याप्रमाणे आहे. यामुळे धर्मांतराला प्रोत्साहन दिल्यासारखे होते.’’ असे सांगितल्यावर ‘मेन्स स्टुडिओ’च्या मालकांनी तत्परतेने पुतळ्यांना घातलेल्या लाल टोप्या काढल्या. (प्रबोधनानंतर अशा प्रकारे तत्परतेने धर्माचरणाची कृती सर्वत्रच्या हिंदूंनी केली, तर धर्मांतराला आळा बसेल ! – संपादक)

रायगडमधील धर्मांतराचे केंद्र पनवेल आहे का, याचे अन्वेषण होऊन राज्यात त्वरित धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक हिंदु जनजागृती समिती

२ टक्के ख्रिस्त्यांची लोकसंख्या असलेल्या पनवेलमध्ये १६ चर्च निर्माण होणे, ही गंभीर गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अवाढव्य चर्च पनवेलमध्ये बांधण्याचा उद्देश काय आहे ? त्यांना अधिकृत अनुमती प्रशासनाने दिली आहे का ? चर्च उभारणीसाठी पैसा कुठून आला ? त्या सर्वांचे योग्य प्रकारे अन्वेषण व्हायला हवे. या चर्चच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचे उघड दिसत आहे. एकीकडे सरकार मंदिरांतील धन सामाजिक कामांसाठी वापरत आहे; मात्र चर्चमधील पैसे घेत नाही. माझे महाराष्ट्र शासनाला आवाहन आहे की, नेहमी तुम्ही मंदिरांकडून पैसा घेता. कधीतरी या चर्चकडून पैसा घेतला पाहिजे. धर्मांतराचे हे भयानक षड्यंत्र लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा आणि त्यावर प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशी मी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करत आहे.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा उपद्रव रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटित !

मिशनर्‍यांच्या या वाढत्या उपद्रवाला रोखण्यासाठी आता काही हिंदुत्वनिष्ठांनीही एकत्र येऊन या विरोधात लढा उभारण्याचे निश्‍चित केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते येथील गावागावांमध्ये जाऊन धर्मांतराची समस्या आणि त्याची भयावहता जाणून घेत आहेत, तसेच त्याविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी विविध माध्यमांतून जागृती करत आहेत. धर्मांतरित झालेल्यांची माहिती घेऊन ‘त्यांची कशी फसवणूक झाली आहे’ आणि ‘हिंदु धर्माचे महत्त्व’ याविषयी सांगत आहेत. निदान यापुढे होणारी धर्मांतरे रोखावीत, त्यासाठी हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व समजावे, याविषयी व्यापक स्तरावर जागृती करण्यासाठी पनवेल येथील मिडल क्लास मैदानात ६ जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आलेे आहे.

गेली ७२ वर्षे हिंदूंना धर्मशिक्षण न दिले गेल्याने आणि योग्य पद्धतीने धर्माचरण न केल्याने त्यांना धर्माचे महत्त्व लक्षात आलेले नाही आणि म्हणून त्यांच्यात धर्माभिमानही नाही. त्यामुळे पैशासाठी हिंदु धर्मांतरीत होत आहेत. प्रचारकांच्या मायावी बोलण्यास भुलून हिंदु स्वत:सह पुढील पिढ्यांची हानी करत आहेत. धर्मांतरीत होणे म्हणजे स्वत्व गमावणेच आहे, हे दुर्दैवाने हिंदूंच्या लक्षात येत नाही ! लक्षावधी वर्षे प्राचीन असलेला हिंदु धर्म हा परिपूर्ण आणि मानवी जीवनाचा सर्वांगीण उद्धार करणारा आहे, हे धर्मशिक्षणाअभावी हिंदूंच्या लक्षात येत नसल्याने २ सहस्र वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या संकुचित आणि अपुर्‍या ख्रिस्ती पंथाकडे हिंदु आकर्षिले जात आहेत ! – श्री. सागर चोपदार, हिंदु जनजागृती समिती


Multi Language |Offline reading | PDF