पनवेल येथे ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतराचे भयावह स्वरूप !

हिंदूबहुल पनवेल परिसर ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विळख्यात !

जुने पनवेल, नवीन पनवेल, नवी मुंबई, पनवेल शहराच्या आजूबाजूला असलेली गावे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराच्या बाजूचे आदिवासी पाडे येथील श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशा सर्वच स्तरांतील, तसेच बुद्धीजीवी अन् अल्पशिक्षित हिंदूंचे ख्रिस्त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केल्याचे भयावह चित्र प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून समोर येत आहे ! हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी हे हिंदुद्वेष्टे ख्रिस्ती त्यांच्या नेहमीच्या क्लृप्त्या योजून आणि आमिषे दाखवून हिंदूंची फसवणूक करीत आहेत, त्याचसमवेत काही वेळा हिंदूंना मारणे, त्यांना हिंदूंच्या देवतेच्या मूर्तीला लाथ मारण्यास सांगणे यांसारख्या अत्यंत क्रूर आणि विकृत कृती करून धर्मांतराचे प्रयत्न करीत आहेत. हिंदूंना त्यांच्या धर्मापासून दूर नेऊन हळूहळू त्यांचेे धर्मांतर करण्यासाठी पनवेलसारख्या पूर्वी केवळ २ – ३ टक्के ख्रिस्ती असणार्‍या परिसरात आता तब्बल १६ चर्च उभारली गेली आहेत ! यावरून ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या षड्यंत्राची कल्पना येईल. ‘या चर्चना एवढा पैसा कोठून येतो ?’ आणि ‘तो कशासाठी खर्च होतो ?’, हे उघड करणे आता आवश्यक आहे’, अशी चर्चा पनवेल परिसरात सजग हिंदूंमध्ये होऊ लागली आहे.

पनवेल परिसरातील चर्चची सूची

१. सेंट जॉर्ज फॉरेन चर्च, सेक्टर १८ ए, नवीन पनवेल

२. सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्च, पनवेल रेल्वेस्थानक रस्ता

३. सेंट पीटर मार थोमा चर्च, सेक्टर ५, नवीन पनवेल

४. सेंट फ्रान्सिस चर्च, स्पर्श हॉस्पिटलजवळ, पनवेल

५. बिलिव्हर चर्च, कोळखे, पनवेल

६. सेंट जॉर्ज जेसोओ चर्च, आदई, पनवेल

७. सेंट सेबॅस्टियन चर्च, सेक्टर ८, कळंबोली, पनवेल

८. होली स्पिरिट चर्च, सेक्टर ११, कळंबोली, पनवेल

९. बिलिव्हर ईस्टन चर्च, मुंबई, डायोस, कोळखे गाव, पनवेल

१०. द पॅन्टेकोस्टल चर्च, पळस्पे गाव, पनवेल

११. पनवेल ए जी चर्च, सेक्टर १०, नवीन पनवेल

१२. मेरी माता चर्च, सेक्टर ३५, कामोठे, पनवेल

१३. मसिहा चर्च, रत्नदीप हॉटेलच्या मागे, पनवेल बसस्थानकाच्या जवळ

१४. सेंट फ्रान्सिस चर्च सीएएन् आय डायोस, शिवाजी रोड, पनवेल

१५. न्यू पनवेल चर्च, फायर ब्रिगेडजवळ, नवीन पनवेल

१६. सेंट जॉर्ज ऑर्थोडॉक्स चर्च, सेक्टर १२, कळंबोली

या चर्चची नावे ‘गूगल’वर शोधल्यास यांतील बहुतेक चर्चच्या इमारती भव्य असल्याचे दिसते. या सर्व प्रकरणात आर्थिक आमिषे दाखवून धर्मांतर होत असल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणी अन्वेषण करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात येत आहे.

पनवेल परिसरात कामासाठी येणारे आदिवासी, कामगार आणि मजूर यांचे आमिषे दाखवून धर्मांतर !

श्री. जग्गनाथ जांभळेगुरुजी, पनवेल

‘पनवेल तालुक्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर बस्तान बसवले आहे. गोरगरीब हिंदूंना विविध आमिषे दाखवून, तर कधी आजारासाठी प्रार्थना करण्याचे निमित्त करून मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.

पनवेल परिसरातील आदिवासी आणि मजूर यांच्या गळ्यात ‘क्रॉस’ दिसणे !

पनवेल परिसरात काही बांधकाम व्यावसायिकांकडून (विकासक) बांधकामे चालू आहेत. ही बांधकामे करण्यासाठी गवंडी, मदतनीस आणि अन्य कामगार जवळील आदिवासी पाड्यांतून येतात. काही कामगार हे उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा अशा राज्यांतून आलेले आहेत. या कामगारांनी गेल्या काही वर्षांपासून गळ्यात येशूचे ‘क्रॉस’ घालण्यास आरंभ केल्याचे लक्षात येत आहे !

आदिवासी पाड्यांमधून रुग्णांना प्रार्थनेने बरे करण्याचे आमीष दाखवण्याची नेहमीची युक्ती योजून चालू आहे धर्मांतराचे षड्यंत्र !

पनवेलच्या आजूबाजूला कित्येक आदिवासी पाड्यांमध्येही आजारी व्यक्तीला बरे करण्याचे आमीष दाखवत ‘त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो’, असे या ख्रिस्ती प्रचारकांकडून सांगितले जाते. त्यांनतर एकीकडे त्या रुग्णावर औषोधोपचार चालू असतांना दुसरीकडे हे प्रचारक त्याच्यासाठी प्रार्थना करत असतात. काही दिवसांनी हा रुग्ण बरा झाल्यावर ‘आमच्या प्रार्थनेमुळेच तुमचा माणूस बरा झाला’, असे सांगून आदिवासींचे ‘ब्रेन वॉश’ केले जाते आणि हळूहळू त्यांच्या घरच्यांवर प्रभाव टाकला जातो. त्यांच्या मनाचा ताबा घेऊन ‘तुमचे (हिंदूंचे) देव काही कामाचे नाहीत. त्यांना घराबाहेर काढा. आमच्यासमवेत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येण्यातच तुमच्या कुटुंबाचे भले आहे’, असे सांगितले जाते. त्याच वेळी चर्चचे वातावरण, पाश्‍चात्त्य पोशाख, पैसे आदींद्वारे त्यांना भूलवले जाते.

आदिवासी पाड्यांतील हिंदु युवकांना परदेशात किंवा येथे नोकरी लावण्याचे आमीष !

गरीब आदिवासी पाड्यांतील हिंदु युवकांना येथे किंवा परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवूनही धर्मांतर करण्यात येत आहे.

धर्मांतरित आदिवासी युवकाला परदेशात पाठवून त्याचा उत्कर्ष झाल्याचे दाखवून इतर आदिवासींना धर्मांतर करण्यास उद्युक्त करणे !

आदिवासी पाड्यांतील एखाद्या युवकाला परदेशात पाठवले जाते. काही वर्षांनी तो परत येतो, तेव्हा पाश्‍चात्य पोशाख, इंग्रजी बोलणे, असे त्याचे स्वरूप असते. ते आदिवासींना दाखवून ‘पहा ख्रिस्ती झाल्याने त्याचा कसा उत्कर्ष झाला आहे’, असे भासवले जाते. त्यामुळे अन्य कुटुंबेही त्यांच्या बोलण्याला बळी पडून ख्रिस्ती होण्यास किंवा चर्चमध्ये जाण्यास सिद्ध होतात, अशी माहिती आदिवासी पाड्यांतून कळली.

कोप्रोली गावातील एका प्रतिष्ठितांच्या आईने ‘पूर्वी चर्चमध्ये जात असल्याचे’ सांगणे !

गावातील प्रमुखाचे धर्मांतर केले, तर त्यासमवेत अनेक गावकर्‍यांचे धर्मांतर करणे, सोपे जाऊ शकते, असा ख्रिस्त्यांचा कुटील डाव असतो. त्यामुळे गावातील गरिबांसह काही श्रीमंतही या ख्रिस्त्यांच्या भूलथापांना बळी पडल्याचे दिसून येत आहेत. कोप्रोली गावातील एका प्रतिष्ठितांच्या आईने ‘आम्ही काही मासांपूर्वी वसईतील चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होतो; पण आता जात नाहीत’, अशी धक्कादायक माहिती दिली.

सनातनचे साधक सांगत असलेल्या धर्मांतराच्या समस्येची भयावहता स्वतः कामगारांच्या माध्यमातून अनुभवत आहे ! – राजूशेठ गुप्ते, बांधकाम व्यावसायिक, निळकंठ ग्रूप

पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकांनी धर्मांतराच्या षड्यंत्राविषयी दिली धक्कादायक माहिती !

पनवेल येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निळकंठ ग्रूपचे श्री. राजूशेठ गुप्ते यांनी सांगितले, ‘‘सनातनच्या साधकांनी मला ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या षड्यंत्राविषयी सांगितले. तेव्हा प्रथम माझा विश्‍वास बसला नाही; परंतु त्यात तथ्य असल्याचे आता मी स्वतः अनुभवत आहे. आमच्या कंत्राटदाराचेे कामगार अनेक वर्षांपासून गणेशोत्सव, छटपूजा, दिवाळी या सणांच्या काळात सुट्टी मागत होते; मात्र आता काही कामगारांनी २५ ते ३० डिसेंबर या कालावधीत यांनी सुट्टी मागितली. त्यामुळे मी ‘या काळात सुट्टी कशासाठी ?’, अशी आश्‍चर्याने त्यांना विचारणा केली. त्या वेळी त्यांनी ‘नाताळ साजरा करण्यासाठी, तसेच चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी सुट्टी हवी’, असे सांगितल्यावर मला धक्काच बसला; कारण हे सर्व कामगार हिंदु धर्मीय असून अनेक वर्षांपासून माझ्याकडे काम करतात. त्यामुळे ‘मागील काही मासांपासून या हिंदु कामगारांचे षड्यंत्रपूर्वक धर्मांतर करण्यात आले आहे’, हे माझ्या लक्षात आले. धर्मांतराची ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली असून याला वेळीच आवर घातला पाहिजे. अन्यथा एक एक करून सहस्रो हिंदूंचे धर्मांतर झाल्याचे बघण्याची वेळ सर्वांवर येईल !

आमच्या घरी येणारा सुतार सुतारकाम सोडून ख्रिस्ती धर्मप्रसारक झाला ! – सदाशेठ पाटील, आकुर्ली गाव, पनवेल

आमच्या घरी एक हिंदु सुतार नेहमी यायचा. एकदा माझे पाय दुखत होते. तेव्हा तो म्हणाला ‘येशूचे नाव घ्या, पाय दुखायचे थांबतील.’’ मी म्हणालो, ‘‘मी कशाला येशूचे नाव घेऊ ? मी हिंदु आहे. मी हिंदूंच्या देवाचे नाव घेईन.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘एकदा तरी येशूचे नाव घेऊन बघा.’’ त्यानंतर काही दिवसांनी समजले की, त्याने सुताराचा धंदा सोडून तो पूर्ण वेळ ख्रिस्ती धर्माचा प्रसारक झाला आहे. त्याला त्यासाठी पैसे मिळतात. हे ऐकून मला धक्काच बसला !

पनवेल येथील विचुंबे भागात चालू असलेले ख्रिस्त्यांचे धर्मांतराचे प्रयत्न !

पनवेलमधील विचुंबे गावात १७ डिसेंबर या दिवशी रात्री साडेदहा वाजता एका इमारतीत अचानक १० ते १५ लाल टोपी घातलेले लोक येऊन ढोलकीवर गाणी म्हणू लागले. याविषयी पूर्वा कुलकर्णी यांना आलेला अनुभव त्यांच्याच शब्दांत देत आहोत.

आमच्या समोरच्या घरात रात्री मोठ्याने आवाज येऊ लागल्याने आम्ही दार उघडून पाहिले असता लाल टोप्या घालून १० ते १५ जण ढोलकीवर ‘येशू पैदा हुआ’ आणि ‘सण वर्षाचा नाताळ आला’ अशी मेणबत्त्या लावून मोठ्याने गाणी म्हणत होते. त्या वेळी मी आणि माझ्या यजमानांनी त्यांना हटकले आणि विचारले, ‘‘तुम्ही इमारतीत कसे आलात ? तुम्ही अनुमती घेतली का ? वसाहतीचे अध्यक्ष आदींची अनुमती घेतल्याशिवाय तुम्ही आत येऊ शकत नाही. तुम्ही कोठून आलात ?’’ तेव्हा असे लक्षात आले की, इमारतीच्या खालील पहारेकरी काही कारणाने गच्चीत गेला असता, त्याच वेळी ते इमारतीत घुसले. ते वडाळ्याहून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना आम्ही विचारले, ‘‘रात्रीच्या वेळी तुम्ही मोठ्याने काय करत आहात ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘ आम्ही नाताळनिमित्त गाणी म्हणण्यासाठी आलो आहोत.’’ त्यावर आम्ही त्यांना म्हटले, ‘‘आमच्या इमारतीत कुणीही ख्रिस्ती नाही.’’ अशा प्रकारे चौकशी चालू केल्याने ती मंडळी बिथरली आणि पटकन पादत्राणे घालून त्यांनी काढता पाय घेतला. जलद गतीने ती तेथून निघून गेली.

अधिक चौकशी केल्यावर असे लक्षात आले की, त्या घरीतील वृद्ध स्त्रीच्या संपर्कात ते लोक पूर्वी आले होते. त्यांच्या प्रार्थनेने तिची गुडघेदुखी बंद झाल्याचे त्यांनी तिला सांगितले. आता त्यांनी नाताळनिमित्त गाणी म्हणण्यासाठी येऊ का, असे विचारल्यावर त्या वृद्ध स्त्रीने त्यांना ‘हो’ म्हणून सांगितले.

त्यानंतर आम्ही या घरातील कुटुंबप्रमुखांना हा ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा डाव कसा आहे, हे समजावून सांगितले ‘‘यापुढे ख्रिस्त्यांना अशा प्रकारे घरात घुसू देऊ नका, आपला धर्म महान असून त्यात प्रत्येक गोष्टीवर उपाय आहेत, त्यासाठी अन्य धर्मांतील देवाची आवश्यकता नाही. आज पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर वाढत असून त्यासाठी ख्रिस्त्यांनी १६ चर्च उभारली आहेत. तरी तुम्ही वेळीच सावध व्हा. ख्रिस्त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपले कुटुंब उद्ध्वस्त करू नका !’’

– सौ. पूर्वा श्रीराम कुलकर्णी, विचुंबे, पनवेल

नातेवाइकांना ख्रिस्ती न होण्याविषयी वारंवार सांगूनही ऐकले नाही ! – संतोष शेळके, गौरव शेळके, पनवेलजवळील आदई गावातील युवक

आदई गावातील दोन कुटुंबं नोकरीचे आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आली आहेत. यामधील एका कुटुंबातील महिलेला प्रथम धर्मांतरित केले. त्या महिलेने तिच्या अन्य एका नातेवाइकांना धर्मांतरित केले आहे.

या प्रकरणी या महिलेच्या भाच्यांनी धर्माभिमान्यांना उद्विग्न होऊन सांगितले, ‘‘आम्ही आमच्या नातेवाइकांना ख्रिस्ती धर्म न स्वीकारण्याविषयी वारंवार सांगत होतो; पण त्यांनी वारंवार सांगूनही ते मान्य केले नाही; उलट ‘तुम्ही मला नोकरी देणार आहात का ?’, अशा प्रकारचे प्रश्‍न ते आम्हाला विचारत होते.’’

संतोष शेळके आणि गौरव शेळके या वेळी म्हणाले, ‘‘आम्ही गावचे ग्रामस्थ या नात्याने सर्वांना कळकळीची विनंती करतो, कृपया आपला सर्वश्रेष्ठ हिंदु धर्म सोडू नका ! आमच्या गावातील काही लोक या धर्मांतराला बळी पडले, याचे आम्हाला दुःख आहे. आमच्या गावातील काही लोकांनी ख्रिस्ती पद्धतीने वागणे चालू केले. त्यांनी समाजाचे ऐकले नाही, याचे आम्हाला वाईट वाटते. हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यासच आपले कल्याण होणार आहे !’’


Multi Language |Offline reading | PDF