देवाचे देवपण !

कु. स्वाती गायकवाड

‘देवाला स्वतःचे घर नसते, तर शरणागत भक्ताचे हृदय हेच त्याचे घर असते’, असे एक सूत्र वाचले होते. तेव्हा ‘माऊलींचे अस्तित्व माझ्या हृदयात सदा अनुभवता येण्यासाठी मला अहंभाव सोडून अखंड शरणागत भावातच रहायला हवे, तरच हृदय मंदिरी माऊलीचे आगमन होणार !’, असा विचार मनात आला आणि त्या वेळी पुढील ओळी सुचल्या.

भक्तांच्या हृदय राऊळी ।

रहातसे माझी माऊली ।

रहाण्यास अन्यत्र जागा नसे कुठे ।

आमच्या हृदयी रहाणे, हेच देवाचे ‘देवपण’ असे हो मोठे ॥

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२०.८.२०१५)


Multi Language |Offline reading | PDF