सैन्यातील शीख सैनिक आणि अधिकारी यांना ‘खलिस्तान’साठी भडकावण्याचा पाकचा प्रयत्न

पाक हा भारतातील शीख, मुसलमान, निधर्मीवादी, पुरोगामी यांना भारताच्या विरोधात भडकावण्याचा गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. असे असूनही पाकला समजेल या भाषेत धडा शिकवण्याचा प्रयत्न ना काँग्रेसने कधी केला आणि ना भाजप करत आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

नवी देहली – गेली ४ दशके भारतातील पंजाबमध्ये शिखांचे स्वतंत्र ‘खलिस्तान’ नावाचे राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची फूस असलेल्या काही देशद्रोही शिखांकडून केला जात आहे. या षड्यंत्राचाच भाग म्हणून भारतीय सैन्यातील शीख सैनिक आणि अधिकारी यांना या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी त्यांना भारताच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न पाककडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

१. पाककडून ‘रेफरेंडम २०२०’ नावाची फुटीरतावादी चळवळ राबवली जात आहे. या अंतर्गत विदेशातील शिखांनी वर्ष २०२० पर्यंत ‘खलिस्तान’ राष्ट्र बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्याला पाकचे पूर्ण समर्थन आहे. याविषयीची माहिती भारतीय सैन्याच्या मुख्य कार्यालयाला पाठवण्यात आली आहे.

२. फुटीरतावाद्यांनी शीख सैनिक आणि अधिकारी यांना भारताच्या विरोधात फितवण्यासाठी एक खोटे पत्र प्रसारित केले आहे. ‘सीक्रेट ऑर्डर’ नावाने हे पत्र ३ डिसेंबर २०१८ या दिवशी प्रसारित करण्यात आले. हे पत्र ‘डायरेक्टरेट ऑफ मिलिट्री इंटेलीजेंस’चे ‘सायकोलॉजिकल ऑपरेशन्स विंग’चे उपसंचालक असणारे ब्रिगेडियर विक्रम मल्होत्रा यांच्या नावाने ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ आणि ‘वाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ यांना पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

३. या पत्रात ‘भारतीय सैन्यातील अनेक शीख सैनिक आणि अधिकारी पंजाबला भारतापासून स्वतंत्र करण्याच्या फुटीरतावाद्यांच्या चळवळीला समर्थन करत आहेत. असे सैनिक आणि अधिकारी यांची सूची बनवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे’, असे लिहिले आहे.

४. खलिस्तान समर्थक ‘पन्नू’ याने सामाजिक माध्यमातून हे पत्र प्रसारित केले असून तो याद्वारे शीख सैनिक आणि अधिकारी यांना भडकावत आहे. त्याने शीख तरुणांना सैन्यात भरती न होण्याचे आवाहन केले आहे.

५. भारतीय सैन्याने केलेल्या अन्वेषणातून हे पत्र खोटे असल्याचे आणि सैन्यात ‘सायकोलॉजिकल ऑपरेशन्स विंग’ नावाची कोणतीही शाखा अन् ‘विक्रम मल्होत्रा’ नावाचा कोणताही  अधिकारी नसल्याचे समोर आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now