(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांना कशी वागणूक द्यायची, ते मोदी यांना दाखवून देऊ !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची दर्पोक्ती

इम्रान खान यांनी प्रथम पाकमधील अल्पसंख्यांकांना जाचक असणारा ईशनिंदेचा कायदा हटवून दाखवावा, तेथील हिंदूंची पुरातन मंदिरे पाडण्यात आली ती बांधून द्यावीत, शिल्लक असलेल्या; मात्र अतिक्रमण करण्यात आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून ती हिंदूंच्या कह्यात द्यावीत ! हिंदूंना त्यांचे सण आणि उत्सव साजरे करण्याची विनाअट संमती द्यावी; हिंदूंच्या मुलींचे धर्मांधांकडून होणारे अपहरण आणि विवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात ! या कृती करण्याची धमक इम्रान खान यांनी दाखवावी आणि मगच बोलावे !

लाहोर – स्वतंत्र भारतात मुसलमानांवर अत्याचार होणार, हे पाकिस्तानचे निर्माते जिना यांना आधीच ठाऊक होते; म्हणूनच त्यांनी मुसलमानांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती; पण आता अल्पसंख्यांकांना कशी वागणूक द्यायची ते आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवून देऊ, अशी दर्पोक्ती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. तसेच ‘पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे, यासाठी आम्ही त्यांना समान अधिकार दिले आहेत’, असेही ते म्हणाले. अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी भारतातील अल्पसंख्यांकांच्या आणि त्यांच्या मुलांच्या सुरक्षेविषयी चिंता अन् संताप व्यक्त केला होता. त्याचे इम्रान खान यांनी समर्थन करत वरील दर्पोक्ती केली.

 खान यांनी स्वतःच्या देशातील प्रश्‍न आधी सोडवावेत ! – नसीरुद्दीन शाह यांनीच फटकारले

खान यांच्या या विधानाला नसीरुद्दीन शाह यांनी स्वतःच आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, खान यांनी स्वत:च्या देशातील प्रश्‍न आधी सोडवावेत. भारतात ७१ वर्षांपासून लोकशाही असून स्वत:ची काळजी कशी घ्यायची ते आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. (शाह यांनी स्वतःहून इम्रान खान यांना फटकारले हे बरे झाले; मात्र त्यांनी इम्रान खान यांना विचारायला हवे की, पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशसंहार का झाला ? बलुचिस्तानमध्ये बलुचींचा वंशसंहार का होत आहे ? पाकमधून हिंदू भारतात पलायन का करत आहेत ? काश्मीरमधील अल्पसंख्यांक हिंदूंना हाकलण्यासाठी पाकने आतंकवादी का निर्माण केले ? – संपादक)

७१ वर्षांत पाकमध्ये २३ टक्के असलेले हिंदु वरून केवळ २ टक्के राहिले, तरी इम्रान खान अल्पसंख्यांकांशी कसे वागायचे, हे शिकवणार आहेत का ? – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

वर्ष १९४७ मध्ये पाकमध्ये २३ टक्के असलेले हिंदू आता केवळ २ टक्के राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ८ टक्के असलेले मुसलमान आता २० टक्के झाले आहेत. आता आतंकवादी आणि भिकारी असलेला पाकिस्तान, भारताला अल्पसंख्यांकांना कसे वागवायचे हे शिकवणार आहे का ?, असा प्रश्‍न केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी इम्रान खान यांच्या विधानावर केला आहे. (भारतातील ८ राज्यांत, तर ९० जिल्ह्यांत हिंदु अल्पसंख्यांक आहेत, तेथील हिंदूंची भाजप सरकार किती काळजी घेते, हेही गिरीराज सिंह यांनी हिंदूंना सांगायला हवे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now