चित्रपट, दूरचित्रवाणी संच, टायर्स आदींवरील जीएसटीमध्ये कपात

३ राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजप सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असेल ! असे आहे, तर राममंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७०, गोहत्याबंदी आदी निवडणुकीतील परिणामकारक ठरणार्‍या सूत्रांवर भाजप सरकार निर्णय का घेत नाही ?

नवी देहली – ‘जीएसटी परिषदे’च्या झालेल्या बैठकीत दूरचित्रवाणी संच, पॉवर बँक, संगणक, चित्रपटांची तिकिटे यांसह ३३ वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यांच्या दरात कपात करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१९ पासून नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर निर्णय झाला नाही.


Multi Language |Offline reading | PDF