पाकिस्तानात भारतीय राजदूत आणि अधिकारी यांचा छळ

  • सीमेवरच नव्हे, तर राजनैतिक अधिकारी असणार्‍या राजदूतांनाही त्रास देणार्‍या पाकबरोबर आणखी किती दिवस भारत राजनैतिक संबंध कायम ठेवणार आहे ?
  • पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकण्याचे धाडस भारत कधी दाखवणार ?
  • ‘नाक दाबले की तोंड उघडते’ या उक्तीनुसार भारताने पाकच्या राजदूतांचा छळ का करू नये ?

नवी देहली – पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील भारतीय राजदूत आणि उच्चायुक्तालयातील अधिकारी यांचा छळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

या अधिकार्‍यांच्या घरातील गॅस जोडणी कापण्यात आली आहे. तसेच अनेक अधिकार्‍यांची इंटरनेट सुविधाही खंडित करण्यात आली आहे. तसेच या अधिकार्‍यांना भेटायला येणार्‍या पाहुण्यांचा अपमान करून त्यांनाही त्रास देण्यात येत आहे. अनेक अधिकार्‍यांचा पाठलाग करण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. तसेच या मासाच्या आरंभी एका अधिकार्‍याच्या घरात आतंकवादी घुसल्याची घटनाही घडली होती.

त्यामुळे अशा परिस्थितीत तेथे रहाणे अधिकार्‍यांना कठीण जात आहे. याविषयी भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून विचारणा केली आहे. तसेच त्यांना कठोर शब्दांत समजही दिली आहे. (गेंड्याच्या कातडीच्या पाकिस्तानला कितीही कठोर शब्दांत चुका सांगितल्या, तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हे भारताच्या अजूनपर्यंत लक्षात का येत नाही ? भाजपच्या शासनकर्त्यांची अशीच कणाहीन मानसिकता राहिली, तर असा छळ पाकमधील भारतीय अधिकार्‍यांना नेहमीच भोगावा लागणार ! – संपादक)

याआधीही भारतीय अधिकार्‍यांचा छळ करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी मार्च मासातही भारताने राजदूतांच्या होणार्‍या छळाचे सूत्र  पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर उपस्थित केला होता. (पाकला असली भाषा समजत नाही, तरी अशी सूत्रे मांडण्यात वेळ दवडणारे भाजपचे शासनकर्ते ! पाकमधील भारतीय अधिकार्‍यांच्या सुरक्षेविषयी भारतीय शासनकर्ते किती असंवेदनशील आहेत, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now