कोरेगाव भीमा येथे जाणार्‍यांची माहिती जमा करण्यास प्रारंभ

मुंबई – कोरेगाव भीमा येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०१९ या दिवशी जाणार्‍या परिसरातील नागरिकांची माहिती देण्याचा आदेश राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आला आहे. या वर्षी १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश देण्यात आला आहे. या माहितीनुसार किती लोक कोरेगाव भीमा येथे जाणार आहेत, त्याचा अंदाज आल्यावर त्यानुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच सायबर क्राइम विभागाचेही आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर लिखाणावर लक्ष असणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF