अपघात घडू नयेत, यासाठी साधकांनी घ्यावयाची दक्षता आणि प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

‘सध्या आपत्काळाची तीव्रता वाढतच चालली आहे. त्यामुळे वाहनाचा अपघात होणे, तसेच चालतांना पडून दुखापत होणे आदी स्थुलातील घटना साधकांच्या संदर्भात वारंवार घडत आहेत. यासाठी साधकांनी प्रवास करणे, उंचावर उभे राहून सेवा करणे, तसेच अन्य शारीरिक सेवा करणे, या कृती करतांना आवश्यक ती दक्षता घ्यावी !

१. साधकांनी घ्यावयाची काळजी

अ. शारीरिक श्रमाच्या सेवा करतांना, तसेच प्रवासात नामजप आणि प्रार्थना कराव्यात. प्रवासात आध्यात्मिक उपायांद्वारे संरक्षककवच निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

आ. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने दुचाकी चालवण्याची वेगमर्यादा (‘स्पीड लिमिट’) ४० किलोमीटर, तर चारचाकी चालवण्याची वेगमर्यादा ६० किलोमीटर अशी असते. शहरातील रहदारीचे रस्ते, महामार्ग (हायवे), पूल आदी ठिकाणी वाहनाची वेगमर्यादा किती असावी, याचे फलक तेथे लावलेले असतात. त्या वेगमर्यादेचेे, तसेच अन्य नियमांचे पालन करून वाहन चालवावे.

इ. दुचाकी गाडी चालवतांना शिरस्त्राणाचा (हेल्मेटचा), तर चारचाकी वाहन चालवतांना ‘सीटबेल्ट’चा वापर करावा.

ई. वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलू नये, तसेच भ्रमणभाष हाताळू नये.

२. प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

२ अ. यंत्र बनवण्याची आणि ते सिद्ध करण्याची पद्धत ! : ‘एका पांढर्‍याशुभ्र कागदावर पेनने वरीलप्रमाणे यंत्र काढावे. त्यासाठी आधी चौकोन आखावेत. यंत्रात दिल्याप्रमाणे त्या त्या चौकोनात तो तो आकडा लिहावा. आकडे लिहितांना लहान अंकापासून आरंभ करून मोठ्या अंकापर्यंत आकडे लिहावेत. (उदा. आधी यंत्राच्या ४ थ्या स्तंभातील ३ र्‍या ओळीतील ‘१’ हा आकडा लिहावा, त्यानंतर ३ र्‍या स्तंभातील १ ल्या ओळीतील ‘२’ हा आकडा लिहावा इत्यादी.) प्रत्येक आकडा लिहितांना आधी ‘ॐ र्‍हीं नमः ।’ असा नामजप करावा आणि मग आकडा लिहावा. अशा प्रकारे यंत्र कागदावर काढून झाल्यावर त्या यंत्राभोवती उदबत्ती ओवाळावी.

त्यानंतर डोळे मिटून ‘अंजनीसुत-हनुमान् रक्षतु रक्षतु स्वस्ति ।’ (म्हणजे ‘अंजनीपुत्र हनुमान आमचे रक्षण करो आणि आमचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडो’) हा मंत्रजप म्हणत उजव्या हाताचे मधले बोट यंत्रातील एका चौकोनावर ठेवावे. नंतर डोळे उघडून त्या चौकोनात लिहिलेल्या संख्येइतका वरील मंत्रजप करावा.

आता हे ‘अपघात निवारण यंत्र’ सिद्ध झाले असल्याची निश्‍चिती बाळगावी.

२ आ. यंत्र वापरण्याची पद्धत ! : हे यंत्र सिद्ध झाल्यावर ते प्रवासाच्या वेळी आपल्या खिशात बाळगावे. ज्यांचे स्वतःचे वाहन आहे आणि ज्यांना वारंवार लांबचा प्रवास करावा लागतो, त्यांनी यंत्र लिहिलेल्या कागदाचे ‘लॅमिनेशन’ करून घ्यावे. नंतर हे यंत्र चारचाकी वाहनाच्या आत चालकाच्या समोरील काचेला (‘विंडस्क्रीन’ला) उजवीकडे आणि दुचाकी गाडीला पुढच्या बाजूला लावावे. हे यंत्र अपघातापासून संरक्षण करते.’

(संदर्भ : ग्रंथ ‘यंत्र रहस्य दर्शन’)

२ इ. महत्त्वाच्या सूचना

१. ‘६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या अन् आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाकडून हे यंत्र बनवून घ्यावे.

२. यंत्र बनवणार्‍याने आरंभी भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान यांना प्रार्थना करावी.

३. या यंत्राची प्रतिदिन उदबत्तीने शुद्धी करावी.

४. प्रवास सुखरूप झाल्यावर श्रीकृष्ण आणि हनुमान यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now